मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थमहाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर या बंदच्या विरोधात याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर मुंबई हायकोर्टाने धक्का देणारा निर्णय़ दिला आहे.
मुंबई हायकोर्टाने निकाल देतांना म्हटले आहे की, कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा. महाधिवक्ता देवेंद्रकुमार ऊपाध्याय आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठाचे हे आदेश दिले आहेत.
मुंबई हायकोर्टाच्या या आदेशानंतर पोलिसांकडून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नोटीस जारी करण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस लक्ष ठेवून आहेत.