मुंबई – स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह ताब्यात देऊ नये अशा सुचना उच्च न्यायालयाने राज्यातील जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. कोरोना काळातील समस्यांबाबत हायकोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने या सूचना दिल्या आहेत. सध्या मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या तुलनेत उपलब्ध व्यवस्था पुरेशी नसल्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी समोर आल्या आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने राज्यभरातील अंत्यसंस्काराच्या ठिकाण व शवागृहांची स्थितीही सुधारण्याचेही निर्देश दिले.
दुस-या लाटेल राज्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या सर्व राज्यभरातील घटनांची दखल घेत उच्च न्यायालयाने या सुचना केल्या आहेत.