पुणे – सध्या सणासुदीचा काळ असून हिरो इलेक्ट्रिक कंपनी ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स घेऊन आली आहे. या विशेष फेस्टीव्हल ऑफरमध्ये कंपनी ३० दिवसात ३० इलेक्ट्रिक स्कूटर नागरिकांना मोफत ऑफर करणार आहे. सदर योजना दि. ७ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून दि.७ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या ऑफरमध्ये दररोज एका भाग्यवान ग्राहकाला इलेक्ट्रिक स्कूटर मोफत मिळू शकते.
विशेष म्हणजे ही योजना देशभरातील कंपनीच्या ७०० हून अधिक शोरूममध्ये उपलब्ध आहे. स्पर्धा जिंकणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होईल. परंतु त्यासाठी उत्सवाच्या वेळी हिरो इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या स्पर्धेत भाग घ्यावा लागेल. ३० दिवस चालणाऱ्या या ऑफरमध्ये लकी ड्रॉद्वारे स्पर्धेचा एक विजेता दररोज निवडला जाईल. विजेत्या ग्राहकाला कंपनीकडून त्यांनी खरेदी केलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत परत केली जाईल.
तसेच ३० दिवस ३० बाईक ऑफर व्यतिरिक्त, कंपनीने ग्राहकांना ऑनलाइन सेवा बुकिंग सुविधेचा डिजिटल अनुभव देखील वाढवला आहे. ग्राहक आता कंपनीच्या वेबसाइटवर आणि ७०० हून अधिक टचपॉईंटवर हिरो इलेक्ट्रिक स्कूटर बुक करू शकतात. ग्राहकांसाठी, कंपनी ५ वर्षांच्या विस्तारित वॉरंटीसह परवडणारे ईएमआय पर्याय देखील देत आहे. एवढेच नाही तर ग्राहकांच्या सोयीसाठी, कंपनी शून्य डिलिव्हरी शुल्कासह खरेदी केलेल्या स्कूटरची जलद होम डिलिव्हरी देखील देत आहे.
या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यांत हिरो इलेक्ट्रिकच्या विक्रीत अभूतपूर्व वाढ झाली आहे. एप्रिल २०२१ ते सप्टेंबर २०२१ दरम्यान कंपनीने १५ हजार युनिट्सची विक्री केली. गेल्या वर्षी याच वेळी हा आकडा केवळ ३,२७० युनिट्सपर्यंत पोहोचला होता. इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात कंपनीचा ४० टक्के बाजार हिस्सा आहे. तसेच मागणीत वाढ झाल्यामुळे कंपनीने मार्च २०२२ पर्यंत आपली उत्पादन क्षमता १ लाख वरून ५ लाख युनिट्स पर्यंत वाढवण्यास सुरुवात केली आहे.