इंडिया दर्पण विशेष लेखमाला
गोदाकाठचे वैभव – भाग १
विक्टोरिया पूल
नाशिकच्या गोदाकाठी असलेल्या वैभवाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. नाशिक शहरातील पहिली कनेक्टीव्हिटी ही विक्टोरिया पूल होता. गोदा जलमार्ग ते विक्टोरिया पूल (अहिल्यादेवी होळकर पूल) असा असलेल्या या जलमार्गाबाबत आज आपण जाणून घेऊ…
१२८ वर्षांपूर्वी सन १८९५च्या आदी पंचवटी ते नाशिक जाण्यायेण्यासाठी एकमेव मार्ग होता “गोदा जलमार्ग” त्याकाळी पंचवटीतून नाशिक किंवा नाशिकहून पंचवटीत जाण्यायेण्यासाठी श्री गोदावरी नदीतून नाव द्वारे प्रवास करावा लागत असे. किवां गोदावरी नदी वरील सांडव्यावरून प्रवास करावा लागत असे.बहुतांशदा सांडवे पाण्याखाली असायचे त्यामुळे प्रवासासाठी टाळकुटेश्वर देवळा जवळ नाव होती. त्या नावेत (बोट) बसून लोक येणे जाणे करीत. नदीचे दोन्ही तिराला उंच मनोरे दगडात बांधलेले होते. त्या दगडी धक्केवर लोखंडी साखळीने नांवा बांधत असत.
पंचवटी अमरधाम समोर आणि नाशिक अमरधाम बाहेरील ३०० वर्ष जने असलेले दगडी धक्के आजही सुस्थितीत आढळतात. नावमध्ये प्रवासासाठी व्यक्ती मागे १ आणा दर आकारला जात असे. पावसाळ्यात पाणी कमी झाल्यावर, चांदवडकर यांच्या सांडव्यावर हमाल लोक उभे असत. हमाल लोक मनुष्याला पाठीवर घेऊन पलीकडे पोहचविण्यासाठी मजुरीपोटी एका खेपेस “सहा पै” घेत असे. त्यामुळे या भागाचे नाव “नाव दरवाजा” असे पडले.
यासर्व गैरसोयी पाहून नाशिक शहराचे तत्कालीन असिस्टंट कलेक्टर व नाशिक नगरपालिकेचे उपाध्यक्ष श्री काशिनाथ महादेव थत्ते यांच्या पुढाकाराने ब्रिटिशांनी व्हिक्टोरिया पूल बांधला. पुलाचे उदघाटन तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड हेरीस यांनी १४ जानेवारी १८९५ला केले त्याची साक्ष पुलाखालील तक्ति आजरोजी देत आहे. विक्टोरिया पुल नदीवरील सर्वात उंच पूल आहे. त्यावरून आपल्या लक्षात येते कि, त्याकाळी गोदावरी नदीच्या प्रवाह किती विराट होता की टू नाशिक-त्रंबक व जीवनगंगा ह्या घरातील पुस्तकांच्या आधारावर सदरच्या शोध लावणे शक्य झाले असून, नुकताच झालेला श्री गोदावरी नदीच्या प्रगट दिन व नाशिक जिल्हाला १५१ वर्ष पूर्ण होत असतांना हा शोध लागणे समस्त नाशिककरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. ह्या पुरातन वास्तूंचे जतन व संवर्धन पुरातत्व विभागाने केले पाहिजे.
श्री. देवांग जानी
अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती
मो. 9850222100