विशेष प्रतिनिधी, पुणे
सरकारी नोकरीच्या संधींची अनेक जण वाट पाहत असतात. सध्या पंजाब राज्य पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड आणि उत्तर प्रदेश पोलिस दलात मोठ्या प्रमाणात जागा निघाल्या आहेत. त्यामुळे ही संधी चुकवू नका, नक्की अर्ज करा. अधिक माहिती अशी
पंजाब राज्य पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड
पीएसपीसीएलने २ हजार ६३२ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. निवड प्रक्रियेच्या माध्यमातून सहाय्यक लाइनमनच्या १७००, लिपिकच्या ९५४, सहाय्यक सब स्टेशन अटेंडंटच्या २००, कनिष्ठ अभियंताचे ७५ आणि महसूल लेखापाल यांच्या ४६ जागांवर अर्जदारांची नेमणूक केली जाईल.
३१ मे पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छूक उमेदवार पीएसपीसीएलच्या अधिकृत वेबसाइट, पीएसपीसीएल.इन. वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० जून आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवार https://pspcl.in/ या थेट लिंकला भेट देऊन तपशील मिळवू शकतात.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेश पोलिस भरती व पदोन्नती मंडळाने (यूपीपीआरपीबी) अधिकृत वेबसाइटवर एक अधिसूचना जारी केली आहे. तब्बल ९ हजार ५३४ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया १५ जूनपासून सुरू होणार आहे.
इच्छुक उमेदवार यूपीपीआरपीबीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. निवड प्रक्रियेच्या माध्यमातून उपनिरीक्षक सिव्हिल पोलिस, प्लॅटून कमांडर आणि पीएससी आणि अग्निशमन अधिकारी या पदासाठी अर्जदारांची नेमणूक केली जाईल. अधिक माहितीसाठी http://uppbpb.gov.in/ या थेट लिंकवर क्लिक करा.