खासदार हेमंत गोडसे यांनी दिली माहिती
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवीन पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी यासाठी त्यांच्या तिळभांडेश्वर लेनमधील अभिनव भारत मंदिर या निवासकेंद्राचे अत्याधुनिकरण व्हावे , सावरकर यांच्या विविध दुर्मिळ वस्तु छायाचित्रे त्यांचे पुस्तके आणि ज्ञानसंपदेचे जतन करणेकामी निधी मिळावा यासाठी खा . गोडसे यांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे . अभिनव भारत केंद्राच्या विकासकामांसाठी राज्य शासनाच्या पर्यटन मंत्रालयाने पाच कोटी रूपयांच्या निधी मंजूर केला आहे . यामुळे आता स्वातंत्र्यपूर्व काळातील कांतीवीर वि.दा.सावरकर यांच्या तिळभांडेश्वर लेनमधील अभिनव भारत मंदिराचे रूपडे पुर्णत : बदलणार असून स्वातंत्र्यांच्या लढयातील इतिहासाचा साक्षीदार असलेल्या मंदिराला नव्याने झळाळी मिळणार असल्याची माहिती खा हेमंत गोडसे यांनी दिली आहे .
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तिळभांडेश्वर लेनमध्ये निवासस्थान आहे . सन १८ ९९ ते सन १ ९ ० ९ या दरम्यान दहा वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकर या ठिकाणी वास्तव्यास होते . या ठिकाणी वास्तव्यास असताना सावरकर यांनी अभिनव भारत संस्थेची स्थापना करून अनेक आंदोलनांचे रणशिंग फुंकली होती . इंग्रजांच्या विरोधात नेमका कशा पद्धतीने लढा दयायचा याविषयीची रणनिती याच अभिनव भारत संस्थेच्या कार्यालयात आखली जायची . देशभरातील अनेक क्रांतीकारक याच ठिकाणी येवून सावरकरांची भेट घ्यायचे . यामुळे या निवासमंदिराला अनन्य साधारण असे ऐतिहासिक महत्व आहे . अभिनव भारत संस्थेने या निवासस्थानाचे जतन केले असून या निवासस्थानाला अभिनव भारत मंदिर असे नाव दिलेले आहे . परंतु अभिनव भारत मंदिराचा वाडा हा मोडकळीस आलेला असल्याने त्यांतील वस्तु , विविध छायाचित्रे तसेच सावरकरांच्या ठेवा यांचे उचित जतन करणे अवघड होत आहे . यातुनच शहरातील अभिनव भारत मंदिर संस्थेचे सुर्यकांत रहाळकर यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी संस्थाच्या पदाधिका – यांनी तसेच सावरकर प्रेमींनी खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेत सावरकरांच्या अभिनव भारत मंदिराचे आधुनिकीकरण करण्याचे साकडे घातले होते .
क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभिनव भारत मंदिर असलेल्या वाडयाला नव्याने झळाळी मिळावी तसेच स्वातंत्र्य लढयातील त्यांचे प्रेरणादायी कार्य नव्या पिढीतील तरुणांपर्यंत पोहचावे याकामी निधी मिळावा म्हणून गेल्या काही महिन्यांपासून खा . गोडसे यांचे प्रयत्न सुरू होते , दरम्यानच्या काळात गोडसे यांनी राज्यांचे पर्यटनमंत्री आदित्यजी ठाकरे यांची भेट घेऊन सावरकरांच्या अभिनव भारत मंदिराच्या विकास कामासाठी पाच कोटी रूपयांच्या निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली होती . खा . गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने राज्यांच्या पर्यटन मंत्रालयाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पाच कोटी रूपयांच्या निधी नुकताच मंजुर केला आहे . यामुळे आता सावरकर यांच्या तिळभांडेश्वर लेनमधील अभिनव भारत मंदिराचे रूपडे पुर्णतः बदलणार असून मंदिराला नव्याने झळाळी मिळणार आहे . या निधीतून अभिनव भारत मंदिरामध्ये स्वातंत्र्य चळवळी विषयीचे ठळक मुद्दे , अदयावत आणि परीपुर्ण ग्रंथालय , सावरकरांच्या आधुनिक विचार आणि विज्ञान दृष्टी याविषयीचे विशेष संग्रहालय , सन १८५७ ते १ ९ ४७ या दरम्यानच्या स्वातंत्र्य लढयातील क्रांतीकारकांचे फोटो तसेच त्यांच्या विषयीच्या डिजीटल माहितीचे दालन , सावरकरांचे डिजीटल स्वरूपाचे समग्र साहित्य हॉल , मराठी शब्दकोश, स्वातंत्र्य चळवळी विषयीच्या फोटोंची गॅलरी , सावरकरांचे विविध फोटो आणि पुस्तक सामुग्रीचे प्रदर्शन हॉल उभारण्यात येणार आहे .
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत खालील कामांच्या निधीलाही मंजूरी मिळालेली आहे .
सिन्नर तालुका
१, मौजे देशवंडी – पुरातन महादेव मंदिर परिसरात शेड बांधणे , ( ५० लक्ष )
२ पुरातन महादेव मंदिर परिसरात सुशोभिकरण करणे . ( ५० लक्ष )
३. मोह येथे खंडेराव मंदिर परिसर सुशोभिकरण करणे . ( ५० लक्ष )
४. सोनगिरी येथे महादेव मंदिर परिसर सुशोभिकरण करणे . ( ४० लक्ष )
इगतपुरी तालुका
५. कावनई , तेलगल्ली परिसर सुधारणा करणे . ( १० लक्ष )
६. कावनई किल्ल्याकडे जाणारा रस्ता तयार करणे . ( १० लक्ष )
७. कावनई अंगणवाडी परिसर सुधारणा करणे . ( १० लक्ष )
८. कावनई शाळा परिसर सुधारणा करणे . ( १० लक्ष ) .
नाशिक तालुका
९. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत स्वातंत्र्य पूर्व काळातील क्रांतीकारकांचे केंद्र असणा – या अभिनव भारत मंदिर या स्वातंत्र्यवीर वि . दा . सावरकर यांच्या वस्तुचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध . ( ५ कोटी )
१०. संगमेश्वर परिसरात सभामंडप करणे . ( १० लक्ष )