नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या व माजी नगरसेविका हेमलता पाटील यांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र भवन येथे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. पक्षप्रवेशाच्या या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेमलता पाटील यांच्यासह उबाठा गटाच्या सहा वेळा नगरसेविका आणि माजी उपमहापौर रंजनाताई बोराडे, तसेच उबाठा गटाचे माजी नगरसेवक व युवासेना जिल्हाप्रमुख दीपक दातिर यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रसंगी केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार नरेश म्हस्के, खासदार संदीपान भुमरे, शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
हेमलता पाटील नाराज
काँग्रेसने नाशिक मध्य मध्ये उमेदवारी दिली नाही म्हणून त्या प्रचंड नाराज होत्या. त्यांनी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज सुध्दा दाखल केला. पण, नंतर त्यांनी तो माघारी घेतली. पण, त्यानंतर त्यांची नाराजी सुरु होती. त्या शिवसेनेत प्रवेश घेणार याची चर्चा ब-याच दिवसांपासून होती. पण, आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.