नवी दिल्ली – केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, हिंसाचार पीडित स्त्रियांसाठी २७ जुलै पासून देशभरात २४/७ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. हिंसाचारग्रस्त स्त्रियांसाठी तातडीच्या तसेच तातडीच्या नसलेल्या प्रकरणांसाठीही तक्रार निवारणासाठी मदत उपलब्ध करून देणे व समुपदेशन सेवा पुरवणे हे या हेल्पलाईन सेवेचे उद्दीष्ट असेल. हिंसाचारग्रस्त स्त्रियांना पोलीस, रुग्णालय, जिल्हा पातळीवरील कायदेविषयक सेवा अधिकारी, मानसोपचार सेवा अश्या सहाय्यक सेवा तसेच सरकारचे महिलाकेंद्री कार्यक्रम यांची व्यवस्थित ओळख करून देणारी सेवा संपूर्ण देशभरात एकमेव हेल्पलाईन क्रमांकाद्वारे उपलब्ध होईल. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालय व राष्ट्रीय महिला आयोग यांच्या अनेक धोरणांप्रमाणे महिला सुरक्षा ही बाब या हेल्पलाईनच्या प्राधान्यक्रमावर असेल. राष्ट्रीय महिला आयोग, धोरणानुसार महिलांच्या बाबतीतील हिंसाचार व महिलाहक्क उल्लंघनाची विविध प्रकरणे हाताळते. या संबधीच्या तक्रारी www.ncw.nic.in. या संकेतस्थळावर लेखी वा ऑनलाईन नोंदवता येतात. तक्रारीची सुयोग्य तड लावण्यासंदर्भात महिलांना आश्वस्त करत आयोग या स्त्रियांना तातडीचे, महत्वपूर्ण सहकार्य करतो.