नाशिक – विनाहेल्मेट प्रवेश दिल्याने शहरातील आडगाव नाका परिसरातील दंत महाविद्यालय येथील मालमत्ता अधिकारी आणि कॉलेजरोड येथील एचपीटी महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी आस्थापनांमधील हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथके नेमली आहे. हे पथक पाहणी करत असतांना महाविद्यालयात विनाहेल्मेट प्रवेश कर्मचारी व विद्यार्थी आढळल्यानंतर त्यांनी कारवाई केली. गेल्या काही दिवसापासून हेल्मेट न वापरणाऱ्यांवर नाशिकमध्ये कडक कारवाई पोलिसांनी सुरु केले आहे. आता कारवाई अधिक व्यापक करत कर्मचारी, विद्यार्थी विनाहेल्मेट आल्यास अस्थापना प्रमुखांवर कारवाई करण्यात येत आहे. याअगोदर आयटीआय व मॉलमध्ये विनाहेल्मेट वाहनचालक जाताना दिसल्यानंतर कारवाई करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.