नाशिक – वाहन चालवतांना हेल्मेट न घालणा-या ८४ दुचाकी वाहनधारकांना आज दोन तास मुंबई नाका येथील समुपदेशन केंद्रावर तज्ञ व्यक्तीव्दारे समुपदेशन करण्यात आले. समुपदेशनाचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतर त्यांना वाहन ताब्यात देण्यात आले. ९ सप्टेंबर पासून ही मोहिम सुरु करण्यात आली असून त्यात हे ८४ वाहन धारक सापडले. स्वामीनारायण मंदिर, मुंबई नाका, पाथर्डीफाटा, बिटको चौक येथे रस्त्यावर बॅरिकेटींग करुन विना हेल्मेट या दुचाकी स्वारांचे वाहन ताब्यात घेण्यात आले. त्यांना वाहन अदा पावती सुध्दा देण्यात आली.
या मोहिमेसाठी शहर वाहतुक शाखेने युनिट निहाय प्लाईंक स्कॅाट तयार केले असून ही कारवाई पुढील काळात अधिक कडक होणार आहे. त्यामुळे विना हेल्मेट घालून आता तरी बाहेर पडू नका.