नाशिक – शहरातील वाहतूक सुरळीत व सुव्यवस्थित करण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी १५ ऑगस्ट पासून हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही या मोहिम शहरात सुरु केली. त्यास नाशिकच्या नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता ८० टक्के वाहन चालक हेल्मेट परिधान दिसून येत आहे. पण, विनाहेल्मेट घालून ज्या वाहनधारकांनी खोटी माहिती भरुन पेट्रोल घेललेले आहे. अशा वाहनधारकांवर मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १२९, १७७ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या लायसन्स निलंबणाचे प्रस्ताव प्रादेशिक कार्यालयास पाठवित्यात येत आहे. १५ ऑगस्ट पासून आतापर्यंत ७२ लायसन्स निलंबणाचे प्रस्ताव परिवाहन कार्यालयास पाठविण्यात आल्याची माहिती नाशिक शहर वाहतूक विभागाचे सहा. पोलिस आयुक्त सिताराम गायकवाड यांनी दिली.
या मोहिमेबाबत बोलतांना ते म्हणाले की, २०१७ ते २०२१ पर्यंत पाच वर्षात ७८२ प्राणांकित अपघात झाले असून त्यामध्ये ८२५ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. ८२५ प्राणहानी पैक ३९४ दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते. त्यामुळे आयुक्तांनी ही मोहिम सुरु केली. या मोहिमेला नाशिक शहरातील सर्व पेट्रोल मालक, चालक सहभागी झाले. जे दुचाकी स्वार पेट्रोलपंपावर विनाहेल्मेट येतील त्यांच्याकडून फॅार्म अ भरुन घेण्यात येत आहे. शहर वाहतूक शाखा युनिट १,२,३ व ४ कडून वाहनधारकांने फॅार्म मध्ये नमूद केलेल कारणाची शहनिशा वाहधारकांचे घरी जावू करत आहे. ज्या वाहनधारकांनी खोटी माहिती भरुन पेट्रोल घेललेले असेल अशा वाहनधारकांवर मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १२९, १७७ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येवून त्यांचे लायसन्स निलंबणाचे प्रस्ताव प्रादेशिक कार्यालयास पाठवित्यात येत असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.