नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हौसेला मोल नाही .. असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय नाशिकमध्ये एका विवाह सोहळ्यानिमित्त आला. विवाह सोहळ्यात जावयाला आणण्यासाठी सास-यांनी थेट हेलिकॅाप्टरच पाठवले. खरं तर विवाहस्थळ व मुलाच्या गावाचे अंतर अवघे पाच ते सहा किलोमीटरचेच होते. म्हणजेच कारने हे अंतर अवघ्या दहा ते बारा मिनिटारच पार झाले असते. पण, सास-यांची हौस या विवाह सोहळ्यात मोठी ठरली. जावईला घेण्यासाठी खास हेलिकॅाप्टर मागविण्यात आले. विशेष म्हणजे, कारपेक्षा हेलिकॉप्टरद्वारे जावयाच्या विवहस्थळी आगमनाला काहीसा वेळ लागला. पण, शेवटी हौसेला मोल नाही व वेळेचे बंधनही…
हा विवाह सोहळा नाशिक जिल्ह्यातील ढकांबे येथील शेतकरी गोपीनाथ बोडके यांची एकुलती एक कन्या वैष्णवी आणि पिंपळगाव बहुला येथील शांताराम नागरे यांचे पुत्र संकेत यांचा होता. हा विवाह सोहळा गंगापूररोड येथील बालाजी लॉन्स येथं संपन्न झाला. बोडके यांनी आपल्या जावयाला आणण्यासाठी थेट हेलिकॅाप्टरच पाठवले. दोन्ही वधू वर उच्चशिक्षीत आहेत. मात्र, आज दिवसभर नाशिकमध्ये याच विवह सोहळ्याची चर्चा रंगत आहे कारण, हेलिकॉप्टरची हौस….
बघा हा व्हिडिओ
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/339650981121571/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C