मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून लष्कराच्या तुकडीची मदत आणि एअरलिफ्ट करण्यासाठी नाशिकहून हॅलिकॉप्टर मागवण्यात आले आहे. तसेच पुणे येथून एनडीआरएफचे पथक बीड येथे पाठविण्यात येत असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील, कडा गावामध्ये ११ नागरिक, सोभा निमगाव मध्ये १४ नागरिक, घाटा पिंपरी सात नागरिक, पिंपरखेड सहा नागरिक, धानोरा मध्ये तीन आणि डोंगरगण मध्ये तीन असे नागरिक अडकलेले आहेत. या सहा गावातील अडकलेल्या ४४ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकारी, बीड यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार आवश्यक मदत उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले.