लखनऊ – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वाराणसीहून लखनऊला जात असतांना त्यांच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हेलिकॉप्टरवर अचानक पक्षी आदळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली असती असे बोलले जात आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पर्याय म्हणून सीएम योगींना दुसरे हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.