इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – युक्रेनची राजधानी कीवमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात युक्रेनच्या गृहमंत्र्यासह तब्बल १६ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. हेलिकॉप्टर कीवच्या बाहेरील लहान मुलांच्या शाळेत कोसळले. ही घटना कीवच्या ईशान्येकडील ब्रोव्हरी शहरात घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवांशी संबंधित लोक घटनास्थळी पोहोचले. या विमान अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये अपघातानंतर मुलांची शाळा आगीच्या ज्वाळांनी वेढलेली दिसत आहे.
आतापर्यंत अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. युक्रेनचे राष्ट्रीय पोलिस प्रमुख इगोर क्लिमेंको यांनी सांगितले की, आतापर्यंत 16 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. मृतांमध्ये युक्रेनच्या गृहमंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि गृहमंत्री डेनिस मोनास्ट्रिस्की आणि त्यांचे डेप्युटी येवगेनी येसेनिन यांचा समावेश आहे. मोनास्ट्रिस्की 2021 मध्येच युक्रेनचे गृहमंत्री बनले होते. या अपघातात दोन मुलांसह 22 जण जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी प्ले स्कूलमध्ये मुले आणि शाळेचे कर्मचारी उपस्थित होते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
https://twitter.com/AJEnglish/status/1615656337987321858?s=20&t=GJUxe6KKRITx2xairdInPQ
Helicopter Crash in Ukrain Kindergarten 16 Dead with minister