अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले होते. पंधरा दिवसापूर्वी झालेल्या पावसाच्या भरवशावर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या सुद्धा केल्या मात्र पाऊस गायब झाल्याने दुबार पेरणीचे संकट आले होते. मात्र आज जिल्ह्यातही ग्रामीण भागात सुद्धा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा आनंदीत झाला.