अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. आदिवासी पट्ट्यात पावसाचा जोर कायम आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंग गडावरही मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळेच आज दुपारच्या सुमारास गडावरील परतीच्या मार्गावर डोंगरावरुन जोरदार पाण्याचा प्रवाह आला. त्यामुळे या मार्गावरील पाण्याचा जोर वाढला. त्यामुळे संरक्षण भिंतीवरील दगड आणि माती मोठ्या प्रमाणावर वाहू लागली. सदरची भिंत तुटून पाय-यांवरुन जोरात पाणी येऊ लागले. याच मार्गावरुन काही भाविक पाय-या उतरत होते. यातील पाच भाविक हे पाण्याच्या प्रवाहाबरोबर जवळपास पन्नास ते साठ पाय-या खाली घसरत गेले. त्यामुळे या भाविकांच्या हात, पाय व डोक्याला मार लागला आहे. देवी संस्थानच्या कर्मचा-यांना याची माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली. या भाविकांना तातडीने संस्थानच्या दवाखान्यात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तसेच, पुढील उपचारासाठी या भाविकांना वणी येथे पाठविण्यात आले आहे.
बघा व्हिडिओ
Heavy Rainfall Saptashrung Gad Five Devotees Injured