नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवापूर तालुक्यात सरपणी नदीला पुर आल्याने सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी येथील पुलावरुन पाणी वाहत आहेत. त्यामुळे सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गुजरातहून येणारी सर्व वाहने उच्छल-दहिवेल-नंदुरबार मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच डोकारे कारखान्याजवळ जिल्हा रस्ता मार्ग बंद करण्यात आला आहेत. असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
https://twitter.com/InfoNandurbar/status/1546395379830140928?s=20&t=SDecoo-nkO3Q8A3d3Sf6KQ
नागन नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
नागन मध्यम प्रकल्प भरडू ता.नवापूर धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत 24 तासात वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळी 201.70 मीटरची नोंद झाली आहे. प्रकल्पाची महत्तम पूर पातळी 205.73 मीटर असून हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील 72 तासात पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे.
नागन नदीच्या काठावरील भरडू, तारपाडा, सोनारे, भांगरपाडा, बिलबारा, देवळीपाडा, दुधवे, नवागाव, महालकडू,बंधारे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नागन काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.
Heavy Rain Nandurbar District Traffic diversion and alert