भुसावळ – मुंबई विभागामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे रेल्वे प्रशासने ९ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. त्याबाबतची माहिती मध्य रेल्वे विभागाने दिली आहे. यातील आठ गाड्या या रविवारी रद्द केल्या आहे. तर मुंबई मनमाड विशेष यात्रा ही गाडी सोमवारी सुध्दा रद्द करण्यात आलेली आहे.
या रेल्वे गाड्या झाल्या रद्द —
02188 मुंबई जबलपूर गरिब रथ विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द
02811 लोकमान्य टिळक टर्मिनस हटिया विशेष यात्रा आरंभ दिनांक 19.07.2021 ला रद्द
02169 मुंबई नागपूर विशेष विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द
01141 मुंबई आदिलाबाद विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द
02105 मुंबई गोंदिया विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द
02109 मुंबई मनमाड विशेष यात्रा आरंभ दिनांक 19 .07.2021 ला रद्द
07057 मुंबई सिकंदराबाद विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द
02111 मुंबई अमरावती विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द
07612 मुंबई नांदेड राज्यराणी विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द