टोरंटो – ग्लोबल वार्मिंग म्हणजेच हवामान बदलाच्या परिणामामुळे जगभरातील मानवावर विनाश ओढवू लागला आहे. नेहमीच थंड वातावरणाची सवय असलेल्या कॅनडा आणि अमेरिकेतील लोक या दिवसात शरीराच्या विक्रमी उष्णतेमुळे लाहीलाही झाले आहेत. कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबियामध्ये तर परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. येथे सर्व विक्रम मोडत पारा ४६.६ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. रस्त्यावर शुकशुकाट असून कोविड केंद्रे निर्जन आहेत. तसेच उष्णतेच्या लाटेने शाळा व महाविद्यालयेसुद्धा बंद करावी लागली. वायव्य अमेरिकेतील शहरांमध्येही अशीच परिस्थिती आहे. कॅनडामध्ये उष्णतेने ८४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.
कॅनडा हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सुमारे ८४ वर्षांपूर्वीच्या उष्णतेने यंदा विक्रम मोडला आहे. कॅनडामध्ये, कोरोनावरील निर्बंध कमी होत आहेत आणि लोकांना बार, रेस्टॉरंट्स, समुद्रकिनारे आणि उद्यानात जाण्याची इच्छा आहे. कॅनडात या वेळी भारतासारखी उष्णतेची लाट दिसत आहे. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियामध्ये ते ४६.६ डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचले. ब्रिटिश कोलंबिया तसेच व्हिक्टोरिया, कमलूप्स, केलोना यासह अनेक शहरांची ही परिस्थिती आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे येथे शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. बार, रेस्टॉरंट्स आणि समुद्रकिनारे ओस पडली आहेत.
बर्कले येथील अर्थ शास्त्रज्ञ जे.के. हसफॅडर यांनी असे म्हटले आहे की, हा हवामान बदलाचा परिणाम आहे. केवळ कॅनडाच नाही तर वायव्य अमेरिकेचा पोर्टलँड, आयडाहो, ओरेगॉन आणि पूर्व वॉशिंग्टनही प्रचंड उष्णतेमुळे तापत आहेत. पोर्टलँडमध्ये पारा ४७ डिग्री सेल्सियस पार गेला. त्याचबरोबर सालेम शहरातील तापमान ४७.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सन १८९० मध्ये तापमान गणना सुरू झाल्यापासूनचे हे सर्वात उच्च तापमान आहे. इडाहो, ओरेगॉन आणि पूर्व वॉशिंग्टन, न्यूयॉर्कसह बर्याच शहरांमध्ये, तीव्र उष्णतेमुळे विजेचा वापर वाढला आहे, त्यामुळे वीज खंडित झाली आहे. संपूर्ण भागातील वीज एकाच वेळी वीजेचा दाब वाढू नये म्हणून वेगवेगळ्या भागात तासन्तास वीज कापावी लागत आहे.
पेनसिल्व्हेनिया येथील स्टेट कॉलेजचे हवामानशास्त्रज्ञ, पॉल वॉकर म्हणाले की, ४० वर्षांत अशी उष्णता त्यांनी अनुभवली नव्हती. तसेच बोस्टन, नेवार्क आणि न्यूयॉर्क शहर देखील प्रचंड उष्णतेमुळे त्रस्त आहेत. लोक पाळीव प्राण्यांना थंड पाण्याच्या ट्रेमध्ये ठेवून बर्फाच्या पॅकसह थंड करत असलेले फोटो शेअर करीत आहेत.
https://twitter.com/NASAEarth/status/1409919600838516749