नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बायपासचे नाव काढले तरी अनेकांच्या हृदयात ‘धस्स’ व्हायला होते. सहा-सात तास लागणारी भूल, तीन-चार दिवसांचे आयसीसीयूतील वास्तव्य. छातीवर, पोटावरच्या जखमा व जखमांचे व्रण, टाके, इन्फेक्शन, येणारा थकवा, मानसिक ताणतणाव यामुळे अनेकजण शस्रक्रिया टाळतात. मात्र, असा कुठलाही त्रास न होता ‘कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी’ हा एक चांगला पर्याय रुग्णांसाठी उपलब्ध झाला आहे.
कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टीचे भव्य शिबिराचे आयोजन मुंबईनाका येथील एसएमबीटी क्लिनिक येथे येत्या १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दु. ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. यादरम्यान प्रख्यात हृदयरोग तज्ञ व एसएमबीटी हॉस्पिटलमधील हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ गौरव वर्मा रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. विशेष म्हणजे, या शिबिरात मोफत अँजिओग्राफी तर अवघ्या ५००/- रुपयांत २ डी इको तपासणी केली जाणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अनेक रुग्णांवर बायपास शस्रक्रिया करणे गरजेचे असतानाही त्यांच्यावर शस्रक्रिया करणे अवघड होते. अनेकांना वेगवेगळ्या व्याधी असतात, त्यामुळे अशा रुग्णांवर शस्रक्रिया करणे जिकरीचे होते. या रुग्णांना कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टीचा सल्ला दिला जातो. गेल्या महिन्यात १०० हून अधिक रुग्णांवर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या शिबिरात कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी करण्यात आली. यासोबतच दर महिन्याच्या अखेरच्या शनिवारी आणि रविवारी बालहृदय विकारावर उपचार केले जात असून हजारो बालकांना नवे जीवन मिळाले आहे.
डॉ वर्मा सांगतात की, हृदयविकाराचे अनेक रुग्ण इतक्या अखेरच्या टप्प्यात रुग्णालयात येतात की, त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्याच्या शक्यताच मावळलेल्या असतात. तसेच अनेकांना बायपास शस्रक्रीयेची भीती वाटते. रुग्ण किंवा नातलग बायपास करण्यासाठी तयार होत नाहीत. अशा वेळी कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टीचा पर्याय उपलब्ध असतो. कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टीसाठी लागणारी सर्व प्रकारची साधनसामुग्री एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे मोठ्या शहरांत रुग्ण नेण्याची गरज आता राहिली नसून नाशकात हे उपचार करणे शक्य झाले आहे. कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी झाल्यानंतर अवघ्या काही तासांत रुग्ण बरा होतो, त्यामुळे या उपचाराकडे रुग्णांचा कल वाढला आहे.
त्यामुळे या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे. हे शिबिर येत्या सोमवारी (दि १३) रोजी सकाळी १० ते दु. ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून शिबिरात रुग्णांसाठी मोफत अँजिओग्राफी व अवघ्या ५००/- रुपयांत २ डी इको तपासणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी 090750 23248 / 77200 53260 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
हे उपचार ‘एसएमबीटी’त शक्य
आयव्हीयुएस (IVUS), रोटाब्युलेटर(ROTA) सह जटिल अँजिओप्लास्टी, ओसीटी (OCT) गाईडेड अँजिओप्लास्टी, IVUS (इंट्रा व्हॅस्कुलर अल्ट्रा सोनोग्राफी गाईडेड अँजिओप्लास्टी)
कॅथलॅबची वैशिष्ट्ये
• हाय क्वालिटी फ्लॅट पॅनलसह कॅथलॅब मशीन सज्ज
• लॅमिनार एअरफ्लोसोबतच सर्वोत्कृष्ट छायाचित्रांसह सुसज्ज मोड्युलर ओटी
• रेडीयल रूटच्या माध्यमातून अँजियोग्राफी, कॉम्प्लेक्स अँजियोप्लास्टी आदींचा समावेश आहे
• कायमस्वरूपी पेसमेकरसाठी आईसीडी, ड्यूयल चेम्बर पेसमेकरची रिदम डिस्टर्बेंससाठी ईपी स्टडीची सुविधा
• २४ तास इंटरवेंशनल कार्डियोलॉजिस्ट उपलब्ध
• निदान आणि उपचारासाठी अनुभवी कार्डियोथोरेसिक सर्जन २४ तास उपलब्ध असून १०० आयसीयु बेड्सचा यात समावेश आहे.
• 2डी इको, स्ट्रेस टेस्ट, आईएबीपी मशीन आणि होल्टर मॉनिटर अद्ययावत सुविधांसह उपलब्ध
शासकीय योजनांच्या माध्यमातून मोफत उपचार
उपचार प्रक्रिया अवघड असली तरीदेखील शासनाच्या जीवनदायी आरोग्य योजनेत हा आजार मोडतो. त्यामुळे योजनेच्या माध्यमातून हे उपचार मोफत केले जात आहेत. सर्वसामान्य रुग्णांवर तात्काळ उपचार व्हावेत या दृष्टीकोनातून एसएमबीटीकडून नुकताच एक व्हॉट्सअँप क्रमांक 9011067122 जारी करण्यात आला आहे. या क्रमांकावर रुग्णाचे रिपोर्ट्स पाठवल्यास संबंधित तज्ञ डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन केले जाते.
Heart Surgery Angioplasty Nashik New Facility
SMBT Hospital