सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव -स्वीमिंग पूल मध्ये पोहायला गेलेल्या एका १९ वर्षीय तरुणाचा तीव्र हार्टअँटकक आल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी मालेगाव मध्ये घ़डली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. जयेश भरत भावसार असे या तरुणाचे नाव असून जयेश आणि त्याचा मित्र दुपारच्या सुमारास पोहायला गेले होते. जयेश याने पाण्यात सूर मारल्यानंतर तो स्विमिंग टँकच्या दुस-या बाजूला पोहत पोहचला. त्यानंतर तो काही वेळ पाण्यातच होता. मित्राने त्याला बाहेर काढल्यावर जयेश हालचाली सुध्दा करत होता. मात्र त्यानंतर त्याला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले मात्र त्यापूर्वी तो मृत झाला. तीव्र हार्ट स्ट्रोकमुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली.