मुंबई – विस्कळीत दिनचऱ्या आणि खाण्यापिण्यामुळे मधुमेह हा अतिशय सामान्य आजार होऊन बसला आहे. या आजारामुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढून जाते आणि स्वादुपिंडातून इंशूलिन हार्मोन निघणे थांबून जाते. ही स्थिती टाईप २ च्या मधुमेहाच्या रुग्णांमध्ये आढळून येते. तज्ज्ञांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार मधुमेहाच्या रुग्णांसाठी ब्लड शुगर नियंत्रित करणे हे एक मोठे आव्हान असते. त्यामुळे औषधांशिवाय पर्याय उरत नाही. तुम्हीपण मधुमेहाने ग्रस्त असाल आणि ब्लड शुगर नियंत्रित करायची असेल तर लसूण-दूध प्यायला हवे. यात तातडीने ब्लड शुगर नियंत्रित करण्याची क्षमता आहे. अनेक संशोधनांनंतर हे पुढे आले आहे की मधुमेहाच्या रुग्णांसाठी लसूण आणि दूध अमृताप्रमाणे आहे.
लसणाचे फायदे
चव चांगली करण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. आयुर्वेदात तर लसणाला औषध मानले गेले आहे. यात अनेक औषधाचे गुणधर्म आहे. ते आरोग्य तसेच सौंदर्यासाठी फायद्याचे आहेत. विशेषतः हिवाळ्यात लसूण खालल्याने सर्दी, खोकला, ताप यातून लवकर सुटका करता येते. त्यासोबतच मधुमेह, मलेरिया, रक्तदाब, संक्रमण आणि दाताच्या दुखण्यावरही हे उपायकारक आहे. डॉक्टर तर दररोज सकाळी उपाशीपोटी लसूण खाण्याचा सल्ला देतात.
दुधाचे फायदे
जर्नल आफ डेअरी सायन्स यात प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार सकाळच्या नाश्त्यातदूध घेतल्याने ब्लड शुगर दिवसभर कमी किंवा नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना विशेषत्वाने हा सल्ला दिला जातो.
लसूण-दुधाचे फायदे
researchgate.net या संकेतस्थळावर आलेल्या एका संशोधनातून पुढे आले आहे की टाईप २ च्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी लसूण औषधाप्रमाणे आहे. या संशोधनात ४५ लोक सामील जाते होते. ते सारे मधुमेहाचे रुग्ण होते. त्यांना चार आठवडे लसणाच्या अर्कातून तयार करण्यात आलेल्या टॅबलेट्स घेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांचे ब्लड शुगर कमी झाले. त्यामुळे डॉक्टर मधुमेहाच्या रुग्णांना लसणाला आपल्या आहारात सामील करण्याचा आणि लसूण-दूध पिण्याचा सल्ला देतात.
कसे घ्यायचे
जर आपण मधुमेहाचे रुग्ण असाल आणि ब्लड शुगर नियंत्रित करण्याची इच्छा असेल तर दररोज सकाळी नाश्त्यात लसूण-दूध घ्याच. त्यासाठी लसणाच्या दोन कळ्या दूध घेताना खाऊन घ्या.