तवांग (अरुणाचल प्रदेश) – देशभरात सध्या कोरोना विरुद्धचा लढा सुरू आहे. याच अंतर्गत करोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. या मोहिमेचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आरोग्य सेवक. देशाच्या विविध भागात अतिशय विपरीत भौगोलिक परिस्थिती आहे. अनेक आव्हाने आहेत. मात्र, त्यावर मात करत आरोग्य सेवक त्यांची मोलाची भूमिका बजावत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. राज्यातील अतिशय दुर्गम भागातील एका आरोग्य सेवक अतिशय भयानक अशी नदी ओलांडून लसीकरणासाठी जात असल्याचे दिसून येत आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी यासंबंधीचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. बघा हा अतिशय अफलातून व्हिडिओ
https://twitter.com/kishanreddybjp/status/1449268761840611337