मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – व्हिटिलिगो हा संसर्गजन्य नसलेला त्वचेचा विकार आहे. हा त्वचाविकार झालेल्या व्यक्तीच्या त्वचेवर गुळगुळीत पांढऱ्या रंगाचे डाग तयार होतात. हे बहुधा चेहरा, पाय, मनगट वा हातांवर तयार होतात. भारतातील सुमारे ५-८% लोकसंख्येला हा आजार आहे. डॉ. बत्राजमधील डॉक्टरांनुसार २० ते २५ वयोगटातील व्यक्तींमध्ये व्हिटिलिगोचे प्रमाण अधिक आहे.
वैद्यकीय स्रोतांची कमतरता आणि उपचारांचा खर्च यामुळे अनेक रुग्णांवर उपचारच होत नाहीत. त्याचप्रमाणे व्हिटिलिगोसारख्या त्वचेच्या आजाराशी निगडित असलेला सामाजिक कलंकामुळे रुग्णाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. या आजारावर कोणताही उपचार नाही, असे त्यांना वाटते. पण चांगली बातमी ही आहे की, होमियोपथीने हा आजार बरा होऊ शकतो. होमियोपथी ही व्हिटिलिगोवर उपचार करण्याची सुरक्षित, हळुवार व परिणामकारक उपचारपद्धती आहे.
प्रख्यात होमियोपथीतज्ज्ञ, पद्मश्री पुरस्कारप्राप्त आणि डॉ. बत्राज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक डॉ. मुकेश बत्रा म्हणतात की, थायरॉइड, सोरायसिस आणि मधुमेहासारख्या इतर ऑटो-इम्युन (शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणा स्वतःच्याच सुदृढ ऊतींना बाहेरील घटक समजते व त्यावर हल्ला करते) आजारांचा व्हिटिलिगोशी संबंध आहे. ते पुढे म्हणतात की, डॉ. बत्राज हेल्थकेअरमध्ये व्हिटिलिगोच्या २४,०४७ रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांच्यापैकी ३,१४३ रुग्णांना सोरायसिस, थायरॉइडचा आजार किंवा मधुमेहासारखे इतर ऑटो-इम्युन आजार होते. डॉ. बत्राजमधील डॉक्टरांनुसार २० ते २५ वयोगटातील व्यक्तींमध्ये व्हिटिलिगोचे प्रमाण अधिक आहे.
डॉ. बत्राज हेल्थकेअरने नैसर्गिक होमियोपथी उपचारपद्धतींनी व्हिटिलिगो असलेल्या २४,०५० व्यक्तींच्या आयुष्यात नवा आशेचा किरण दाखवला आहे. होमियोपथिक औषधांनी उपचार केलेले रुग्ण आता सामान्य, भरपूर प्रेम व संधी असलेले आयुष्य जगत आहेत.
डॉ. मुकेश बत्रा पुढे म्हणाले, “;माझ्या ५० वर्षांच्या होमियोपथीच्या कारकिर्दीत व्हिटिलिगो हा सर्वाधिक गैरसमज असलेला व चुकीच्या पद्धतीने सादर केलेला त्वचाविकार आहे. व्हिटिलिगो हा आजार संसर्गजन्य आहे हा त्याबद्दल असलेला सर्वाधिक आढळणारा गैरसमज आहे. पण वस्तुस्थिती ही नाही. व्हिटिलिगो हा आजार इतका अनपेक्षित आहे की, सकाळी झोपून उठल्यावर रुग्णाला अचानक पांढरा डाग दिसू शकतो किंवा त्वचेवर असलेल्या पांढऱ्या डागाचा आकार वाढलेला आढळून येऊ शकतो.
गैरसमजांबद्दल बोलताना ते म्हणाले, “कौटुंबिक पार्श्वभूमी, ऑटो-इम्युन आजार, टोकाचा ताण, जनुकीय उत्परिवर्तन, तणाव व चिंतातुरता याचा रुग्णांवर भावनिकदृष्ट्या परिणाम होतो आणि व्हिटिलिगो उद्भवू शकतो. असे असले तरी व्हिटिलिगोच्या होमिपथिक उपचारांमध्ये लक्षणे व रुग्णाच्या दैनंदिन जीवनातील मानिसक आजारांना हाताळले जाते. व्हिटिलिगोवरील होमियोपथी उपचारांमध्ये लक्षणे दाबली जात नाहीत तर सर्वात नैसर्गिक, सुरक्षित व परिणामकारक मार्गाने रंगद्रव्याच्या पुनर्निर्मितीला चालना देण्यात येते.”
health tips young peoples facing disease relation with diabetes thyroid