पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – दैनंदिन काम करताना प्रत्येकालाच वाटते की आपल्यामध्ये उत्साह असावा. परंतु काही वेळा आळस आल्यास जांभळी येते. त्यानंतर वारंवार जांभई येण्याची सुरुवात होते. आपल्या सोबत इतरांना देखील जांभई येऊ लागते. त्यामुळे कामात लक्ष लागत नाही, नेमके असे का होते. जास्त जांभई येण्याची कारणे म्हणजे झोप न लागणे, थकवा आणि कंटाळा ही जांभई येण्याची मुख्य कारणे आहेत, परंतु जांभई येण्यामागे इतरही अनेक कारणे आहेत. त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
हायपोथायरॉईड :
हायपोथायरॉईडीझमची समस्या असते तेव्हा शरीर आवश्यक प्रमाणात थायरॉईड हार्मोन तयार करू शकत नाही. ही एंडोक्राइन सिस्टमशी संबंधित समस्या आहे ज्यामध्ये थायरॉईड ग्रंथी पुरेसे थायरॉईड संप्रेरक तयार करत नाही. त्यामुळे जांभईही सतत येत राहते.
झोप कमी होणे :
सर्वात प्रमुख आणि सामान्य कारण म्हणजे रात्रीची झोप कमी होणे. त्यामुळे लोक दिवसभर जांभई देतात. संसर्गजन्य रोगांशी लढण्यासाठी आपल्या शरीराला ७ते ८ तासांची झोप लागते. पुरेशी झोप न मिळाल्यास लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. याशिवाय झोपेच्या कमतरतेमुळे स्लीप अॅपनिया नावाच्या विकाराची समस्या देखील होऊ शकते, ज्यामुळे जांभई सतत येत राहते.
साइड इफेक्ट्स :
काही औषधांचे दुष्परिणाम देखील सतत मळमळ होण्याचे कारण असू शकतात. जास्त जांभई दिल्याने बद्धकोष्ठता, सूज येणे, जुलाब, चक्कर येणे आणि तोंड कोरडे पडणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे यापासून दूर राहायचे असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.
ताणतणाव :
तणावाखाली शरीरात काही रसायने आणि हार्मोन्स वाढू लागतात. जास्त ताण घेतल्यानेही जास्त जांभई येऊ शकते. त्यामुळे ताणतणावापासून दूर राहावे
हृदयाच्या समस्या :
सतत जांभई येणे देखील हृदयाच्या समस्या दर्शवते. खरं तर, जेव्हा शरीरात ऑक्सिजनची कमतरता असते, तेव्हा रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. याकरिता काळजी घ्यावी.
Health Tips Yawning Causes deficiency disease