नागपूर (इंडिया दर्पण वृतसेवा) – गोड द्राक्षसर्वांनाच आवडतात, तसेच मनुका किंवा बेदाणा ( किसमिस ) देखील सर्वांनाच प्रिय असतात, मिठाई आणि गोड पदार्थांमध्ये मनुका खातात, परंतु अनेकांना त्याचे आश्चर्यकारक फायदे माहित नाहीत. घरातील लहान मोठ्या मुलांना भिजवलेले मनुके खायला दिले जातात. त्यामागील कारण म्हणजे त्यांच्यामध्ये असलेले अनेक पोषक तत्व होय. वजन कमी करण्यापासून हाडे मजबूत करण्यापर्यंत अनेक प्रकारे मनुका शरीरासाठी उपयुक्त आहे. कोरडे मनुके खाण्याऐवजी भिजवून खाल्ल्यास त्याची पौष्टिकता वाढते. जाणून घ्या भिजवलेले मनुके खाण्याचे काय फायदे आहेत.
वजनावर नियंत्रण ठेवायला बेदाणे खाणे चांगले असते. कारण मनुकामध्ये नैसर्गिक साखर आढळते, ज्यामुळे मिठाईची लालसा कमी होते. भिजवलेले मनुके रक्तातील साखर टिकवून ठेवतात आणि अतिरिक्त कॅलरी देखील देत नाहीत. त्यामुळे असे केल्याने वजन व्यवस्थित राहते. यामध्ये फायबर्स असतात, त्यामुळे जर ते स्नॅक्स म्हणून खाल्ले तर भूक लागत नाही.
भिजवलेल्या मनुकामध्ये ब आणि क जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. ही जीवनसत्त्वे शरीराच्या प्रतिकारशक्तीसाठी आवश्यक आहेत. अशाप्रकारे, ते अनेक प्रकारच्या संसर्गापासून वाचवते. बेदाण्यामध्ये फायबर असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेपासून वाचवते तसेच पचनक्रिया बरोबर ठेवते.
भिजवलेल्या मनुकामध्ये पॉलिफेनॉल फायटोन्यूट्रिएंट्स असतात. हे डोळ्यांच्या स्नायूंसाठी चांगले आहेत. केवळ वजन कमी करण्यासच नाही तर तोंडाचा वाईट वास दूर करण्यासही मनुका मदत करते.
जर कोणी अल्कोहोल घेत असाल तर आहारात भिजवलेले मनुके अवश्य घ्या. भिजवलेले मनुके आणि मनुका पाणी दोन्ही यकृतासाठी चांगले असतात. त्यात बायोफ्लाव्होनॉइड्स असतात, ते यकृत डिटॉक्सिफाई करतात आणि रक्त शुद्ध करतात.
महिलांनी मनुका जरूर खावे. स्त्रियांमध्ये हाडांची घनता ही एक मोठी समस्या आहे. वयाची ३० ओलांडल्यानंतर विशेषतः महिलांनी रोज भिजवलेले मनुके खावेत. त्यात तांबे असते, ते लाल रक्तपेशींचे उत्पादन देखील वाढवते. विशेषत: अॅनिमिया असलेल्यांनी रोज मनुके खावेत.
Health tips weight loss raisins manuke kismis nutrition