पुणे – आजच्या काळात तरुण असो कि चाळीशी आणि पन्नाशीतील व्यक्ती प्रत्येकालाच आपल्या वाढत्या वजनाबद्दल काळजी वाटत असते. यासाठी सर्वजण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. त्याकरता काही लोक उपाशी देखील राहतात. परंतु यामुळे वजन कमी न होता अपाय होण्याची शक्यता असते.
शरीरातील पोटाची चरबी सर्वात जास्त त्रासदायक ठरत असते. मात्र योग्य जीवनशैली आणि आहारामध्ये थोडीशी काळजी घेतल्यास पोटाची चरबी होऊ शकते. पोटाची चरबी कमी करायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वजन घटविण्यासाठी काय करता येईल हे जाणून घेऊ या…
– अनेक लोक वजन कमी करण्यासाठी जेवण कमी करू लागतात. किंवा जेवण करत नाहीत. मात्र आपण असे करत असाल तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. याउलट तुम्ही नाश्ता केला नाही तर पोटाभोवती चरबी जमा होण्याची शक्यता जास्त असते.
– आपल्याला वजन कमी करायचे असेल तर पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. झोपेची कमतरता शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढवते, त्यामुळे उच्च-कॅलरीयुक्त अन्न खाल्ल्यासारखे वाटते. म्हणूनच, जर वजन कमी करायचे असेल तर 7 ते 8 तास झोपणे खूप महत्वाचे आहे.
– वजन कमी करण्यासाठी पाणी देखील महत्वाची भूमिका बजावते. जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने भूक कमी होते आणि त्यामुळे आपण कमी कॅलरीज घेतो. आपण पुरेसे पाणी पीत नसाल तर पोटातील चरबी कमी करण्यात अडचण येऊ शकते.
– आपल्याला पोटाची चरबी कमी करायची असेल तर आहारात फायबरचा समावेश नक्की करा. जास्त फायबर खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही. तसेच चरबीयुक्त अन्न खाल्ल्यासारखेही वाटत नाही.
– पोटाची चरबी कमी करण्यासाठी, आहारात अधिक प्रथिने घ्या. संशोधनमध्ये हे समोर आले आहे की जे लोक भरपूर प्रथिने घेतात, त्यांच्या पोटातील चरबी लवकर जमा होत नाही. तसेच आहारात कर्बोदके कमी करा. हिरव्या भाज्या, मसूर, पनीर किंवा कोशिंबीर घ्या आणि पोळी आणि भात याचे प्रमाण कमी करा.