मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
असे म्हणतात की, जीवनात किंवा या जगात काहीही वाया जात नाही. प्रत्येक गोष्ट पुन्हा वापरता येते किंवा काहीतरी नवीन बनवता येते, ती आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. अगदी आपण जी फळे खातो त्यांचे कवच किंवा साली देखील उपयुक्त ठरू शकतात. मग ते कोणत्याही फळाची साल असो कोरड्या फळांमध्ये अक्रोड हे सर्वात पौष्टिक आहे, बरेच जण ते नियमितपणे खातात. जीवनसत्त्वे, खनिजे असलेले अक्रोड शरीरासाठी फायदेशीर असते, परंतु काही जण अक्रोडाची साल फेकून देतात.
अनेकांना असे वाटते की, अक्रोड शरीराच्या विविध समस्या दूर करण्याचे काम करते, परंतु अक्रोडाची साल ही कचरा आहे, म्हणून त्याची साल फेकून देतात, परंतु जितके अधिक उपयुक्त आणि फायदेशीर आहे तितकीच त्याची साल देखील उपयुक्त आहे. अक्रोडाची टरफले कचर्यात फेकून दिली नाही तर उलट त्याची उपयुक्तता जाणून घेतल्यास अक्रोडाच्या सालीचा योग्य ठिकाणी वापर करू शकाल. अक्रोडाच्या सालीचा वापर कोणत्या कामात केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊ या…
अक्रोड शरीरासाठी फायदेशीर आहे, त्यामुळे त्याची साल त्वचेसाठीही फायदेशीर आहे. चमकदार त्वचा मिळविण्यासाठी अक्रोडाची साल वापरू शकता. या सालीचा फेस पॅक बनवून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेतील मृत पेशी निघून जातात आणि त्वचा उजळते. अक्रोडाच्या सालीचा पॅक चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात आणि ब्लॅकहेड्सही दूर होतात. या सालीचा फेस पॅक तेलकट त्वचेसाठी फायदेशीर आहे.
अक्रोडाची साल शरीरासाठी तसेच झाडांसाठीही चांगली असते. अक्रोडाच्या कवचांपासून आपण वनस्पतींसाठी कंपोस्ट बनवू शकता. कारण ते उत्कृष्ट सेंद्रिय खते बनवतात. अक्रोडाच्या भुसापासून कंपोस्ट तयार करण्यासाठी, अक्रोडाच्या त्वचेवर एक चमचा अल्कोहोल घाला आणि ते जाळून राख करा. आता जळलेल्या सालीची राख ठेचून रोपात टाका.
घर सजवण्यासाठी अनेकदा हस्तकलेचा वापर करतात. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून चांगली हस्तकला बनवता येते. अक्रोडाच्या सालीनेही घर सजवू शकता. यासाठी अक्रोडाच्या सालीने वॉल आर्ट बनवा. पुठ्ठा किंवा कोणतीही कठीण वस्तू रंगवून त्यावर गोंदाच्या साहाय्याने अक्रोडाची साल चिकटवा आणि वेगवेगळ्या रंगांनी सजवा आणि भिंतीवर लटकवा.
अक्रोडाच्या सालीपासून नैसर्गिक माउथवॉश देखील तयार करू शकता. एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी आणि अक्रोडाची साल तीस मिनिटे उकळा. तसेच उकळलेले पाणी थंड करून बाटलीत भरून ठेवा. त्याचप्रमाणे दात घासल्यानंतर, अक्रोडाच्या सालीपासून तयार केलेल्या माऊथवॉशने आपले तोंड स्वच्छ धुवा.