पुणे – मांसाहार चांगला की, शाकाहार हा वादाचा विषय असला, तरी आपण कोणताही आहार घेत असल्यास तो सकस किंवा परीपूर्ण असणे आवश्यक आहे. शाकाहारी व्यक्तींमध्ये प्रथिनांची कमतरता असल्याचे दिसून येते. ही कमतरता भरुन काढण्यासाठी शाकाहारी व्यक्तींनी प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. हे पदार्थ कोणते ते बघू या…
टोफू : हा पदार्थ सोयाबीनपासून बनविला जातो. तो प्रोटीनचा सर्वोत्तम स्रोत कोणता असून त्यामुळे शरीरासाठी आवश्यक अमीनो अॅसिडस् पुरविले जातात. टोफू चवदार बनवविण्यासाठी त्यात मसाले वापरुन ते पौष्टिक बनवता येतात.
डाळी : विविध प्रकारच्या डाळी या भारतीय पाककृतींमध्ये मुख्य घटक असतात. आहारात डाळी अनेक प्रकारे उपयोगात आणल्या जातात. कारण त्यात भरपूर प्रथिने असतात. लाल मसूरमध्ये आणि हिरव्या वाटाण्यामध्ये प्रथिने, फायबर, लोह, पोटॅशियम भरपूर असतात.
पांढरा हरभरा : यालाच काबुली चणा म्हणतात. भाज्यांव्यतिरिक्त हे प्रथिनेयुक्त खाद्यपदार्थ सलाद, चाटमध्येही खाल्ले जातात. भिजवलेल्या हरभ्यात सर्वाधिक प्रोटीन असतात. हरभरामध्ये प्रथिनेंचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ते जास्त उकळू नये.
शेंगदाणा : सामान्यतः शेंगदाणा हे गरीबांचे काजू आहेत, असे म्हटले जाते. काजू, बदाम, पिस्ता आणि मनुकाच्या तुलनेत भुईमुगाच्या शेंगांचे दर फारच कमी आहेत. त्याच वेळी, आपण शेंगदाणा चिक्की देखील आहारात वापरू शकता.
बदाम : आपली त्वचा, केस, मेंदू, डोळे आणि मेंदूसाठी बदाम खूप फायदेशीर आहेत. बदामांमध्ये प्रथिने भरपूर असतात. ज्यांना बदाम खाणे शक्य आहे. ते भिजलेले बदाम खाऊ शकतात.
ओट्स : आपण मसाला ओट्स किंवा गोड ओट्स खाऊ शकतो, दोघांमध्येही प्रथिने जास्त प्रमाणात असतात. ओट्स तयार करताना ते जास्त काळ शिजवू नये.