इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ज्यांना चवीचं खाण्याची सवय आहे, त्यांच्यासाठी दातदुखी ही फार मोठी समस्या असते. याचं कारण अनेक आवडीचे पदार्थ खाता येत नाही. दातदुखीचा हा त्रास कडक पदार्थ खाल्ल्यामुळे होतो. यासोबतच बॅक्टेरिया किंवा इन्फेक्शनमुळेही हा त्रास होऊ शकते.
दात दुखी ही खरं तर सामान्य समस्या आहे. याचा अनेकांना त्रास होतो. मात्र, ही समस्या जितकी छोटी वाटते तितकीच प्रत्यक्षात ती गंभीर आहे. हे दुखणं किती त्रासदायक आहे, ते ज्याला याचा त्रास होतो, तोच सांगू शकतो. दातदुखीचा त्रास होत असताना अनेकदा बोलणे, खाणे-पिणे सुद्धा कठीण होते. याला साध्य भाषेत रूट पेन असेही म्हणतात. कधीकधी ही वेदना इतकी तीव्र असते की त्यामुळे तोंडही सुजते.
दातदुखीचा त्रास अनेकदा कडक पदार्थ खाल्ल्यामुळे होतो. तसेच, दातात बॅक्टेरिया, इन्फेक्शनमुळेही होऊ शकते. दाताच्या आत असलेल्या नसा अत्यंत संवेदनशील असतात. जेव्हा या नसांना जीवाणूंचा संसर्ग होतो तेव्हा त्यांना तीव्र वेदना होतात. या दातदुखीवर काही घरगुती उपायही आहेत.
दातदुखीवर लवंग किंवा लवंगीचे तेल लावणे हा पारंपरिक उपाय आहे. दातदुखी म्हटले की सर्वचजण पहिल्यांदा हाच सल्ला देतात. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे त्याचे गुणधर्म संसर्ग कमी करण्यास मदत करतात.
मीठ हे नैसर्गिक जंतुनाशक आहे. कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्याने दातांना लगेच आरोम मिळतो. दिवसातून ४-५ वेळा ही प्रक्रिया केल्यास दातदुखीचं दुखणं काही दिवसांतच दूर होईल.
दातदुखीपासून आराम मिळवायचा असेल तर बेकिंग सोडा उपयुक्त ठरू शकतो. तुमच्या नेहमीच्या टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा घाला आणि दुखणाऱ्या दातांवर थेट लावा. यामुळे काही मिनिटांतच तुम्हाला आराम मिळू शकतो.
व्हॅनिलामध्ये देखील अनेक गुणधर्म आहेत. यामुळे दातदुखी बरी होण्यास खूप मदत होते. कापसाच्या बॉलवर व्हॅनिलाच्या रसाचे काही थेंब टाकून सुमारे १५ मिनिटे दुखणाऱ्या दातावर ठेवा. काही वेळाने तुम्हाला वेदना कमी झाल्यासारखे वाटेल.
Health Tips Teeth Pain Home Remedies