मुकुंद बाविस्कर, मुंबई
अनेक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या कोरफडीचा वापर शतकानुशतके सुरू आहे. त्वचा, केस आणि जखमांवर कोरफडीच्या सहाय्याने उपचार करता येतात. तसेच कोरफडीचा गर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवरही उपयुक्त आहे. कोरफड हे आरोग्यास वरदान ठरते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कदाचित याच कारणामुळे तुम्हाला प्रत्येक घरात कोरफडीचे रोप सापडेल.
कॉस्मेटिक आणि स्किन केअर कंपन्या देखील त्यांच्या उत्पादनांमध्ये कोरफडचा वापर करतात. कोरफडीचे अनेक फायदे असू शकतात, परंतु ते अनेक बाबतीत नुकसान देखील करू शकते. असे देखील होऊ शकते की कोरफडीचा गर चेहरा, केसांवर लावल्याने किंवा ते खाल्ल्याने दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कोरफड वापरण्याचे ६ दुष्परिणाम जाणून घेऊ या:
पोटाची समस्या
कोरफडीच्या पानांमध्ये लेटेक्स असून ते झाडाच्या वरच्या थराखाली असते. अनेक जणांना लेटेक्सची ऍलर्जी असते, त्यामुळे पोटाच्या विविध समस्या उद्भवू शकतात. या समस्यांमध्ये छातीत जळजळ, पेटके येणे आणि पोटॅशियमची पातळी कमी असू शकते.
त्वचेची ऍलर्जी
अनेकांना अॅलोवेरा जेलची ऍलर्जी असू शकते. अशा व्यक्तीनी अॅलोवेरा जेलचा वापर केल्यास त्वचेची अॅलर्जी, डोळे लाल होणे, त्वचेवर पुरळ उठणे, जळजळ आणि खाज सुटणे यासारख्या समस्या होऊ शकतात.
रक्तातील साखरेची पातळी
कोरफडीचा रस प्यायल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. कोरफडीच्या रसामध्ये रेचक प्रभाव असतो, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इलेक्ट्रोलाइट असंतुलन होण्याची शक्यता वाढते. जर मधुमेह असेल तर कोरफडीचा रस पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
गरोदरपणात समस्या
गरोदर किंवा स्तनपान देणाऱ्या महिलांनी कोरफडीच्या रसाचे सेवन टाळावे. कोरफडीच्या रसामध्ये त्वचा आकुंचन पावण्याचे गुणधर्म असतात. गरोदरपणात कोरफडीचे सेवन केल्याने बाळंतपणात समस्या उद्भवू शकतात.
पाणी कमी होणे
कोरफडीच्या रसामध्ये आढळणारे रेचक शरीरात पाणी कमी (निर्जलीकरण ) होऊ शकतात. बद्धकोष्ठता किंवा अपचनासाठी जुलाब वापरले जातात.
यकृताचे नुकसान
कोरफडमध्ये बायोएक्टिव्ह संयुगे असतात, जे यकृताच्या डिटॉक्स प्रक्रियेत व्यत्यय आणू शकतात. तसेच आरोग्याच्या काही प्रश्न किंवा समस्या असल्यास नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.