इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या रोजच्या जीवनात म्हणजे जेवणात खाद्यतेलाचा वापर आवश्यक असतो, खाद्यतेलाशिवाय कोणताही पदार्थ तयार होणे शक्य नसते, परंतु भारतात खाद्यतेलाची कमतरता आहे त्यामुळे परदेशातून आपल्याला खाद्यातील आयात करावी लागते, सध्या सन २०२५ ते ३० पर्यंत खाद्यतेलात भारत देश स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सद्यस्थितीत भारत त्याच्या एकूण खपांपैकी फक्त ३० टक्के तेलाचे उत्पादन करतो आहे.
खाद्यतेलाची मागणी २० वर्षात ४० लाख टनावरून १ कोटी ५० लाख टनांपर्यंत वाढली आहे. उद्योग तज्ज्ञांच्या मते, भारतातील खाद्य तेलाची आयात वाढण्याचे कारण जास्त उत्पन्न असणाऱ्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि जास्त प्रमाणात कॅलरीयुक्त सकस अन्न पदार्थ खाल्ल्याने तेलाचा वापर वाढला. तेल वापर वाढल्याने ती येत्या १० वर्षात त्याची आयात २ कोटी वर पोहचू शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आपल्या घरात भाज्या शिजवण्यापासून पुरी तळण्याचे आणि भजी करण्यापर्यंत तेलाचा वापर सगळ्या गोष्टींमध्ये होतो. मोहरी, नारळ, शेंगदाणा, ऑलिव्ह तेल आणि सगळ्यात जास्त रिफाइंड तेल किंवा सोयाबीन तेलाचा वापर केला जातो. परंतु तेल वापरण्याची ही एक पद्धत असते. जर आपण बऱ्याच वेळ तेल गरम केले तर ते आपल्या आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते. तसेच रिफाइंड तेलाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरते.
किचनमध्ये कुंकिग ऑईलचे महत्त्व सर्वाधिक असते. डाळीला फोडणी देण्यापासून ते भाजी बनविण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी तेल गरजेचे असते. तेल आणि आरोग्याचा देखील जवळचा संबंध आहे. आरोग्याप्रती जागृक होऊन लोक अनेकवेळा आपले खाद्य तेल बदलतात. काही अभ्यासानुसार ऑलिव्हचे तेल अधिक चांगले असते.
विशेषतः तेलावर सर्वात कमी प्रक्रिया केली जाते ते तेल आरोग्यासाठी सर्वांत चांगले असते, पॅकिंग तेल दोनदा फिल्टर होत असल्याने त्यातील आवश्यक सत्व नाहीसे होतात. घाण्यातून काढलेले खाद्यतेल कधीही आरोग्यासाठी चांगलेच असते त्यातून नैसर्गिक पोषणमूल्य योग्य प्रमाणात मिळतात. कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते. शेंगदाणा, मोहरी, खोबरे आणि सूर्यफूल यांचे घाण्याचे तेल आरोग्यासाठी उत्तम असते.
तळलेले मसालेदार पदार्थ खायला खूप चविष्ट लागतात. मात्र त्यामुळे हाय कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब , हृदय आणि यकृताच्या विकारांचा धोका वाढतो. एका निश्चित प्रमाणात वापरण्यात आलेले तेल हे केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठीच नव्हे तर शरीरासाठीही आवश्यक मानले जाते. ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणात खाल्लेले बहुतेक पदार्थ हे तेलाच्या मदतीने तयार केले जातात.
रिफाइंड तेल प्रत्येक किचनचा महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला वाटते की, रिफाइंड तेल आरोग्यासाठी चांगले आहे, मात्र रिफाइंड तेल तुमच्या स्वयंपाकासाठी व आरोग्यासाठी देखील फारसे चांगले नसते. कारण रिफाइंड तेल बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये हाय टेम्परेचरचा वापर होतो. ज्यामुळे यातील न्युट्रिशन (पोषक तत्व) कमी होते. रिफाइंड तेलामध्ये ट्रांस फॅट देखील आढळते, त्यामुळे आरोग्याला नुकसान पोहचते.
रिफाइंड तेलाच्या तुलनेत घाण्याचे तेल अधिक चांगले आहे. हे तेल बनविण्यासाठी कोणत्याही टेम्प्रेचर तंत्राचा वापर होत नाही, यामुळे यातील न्यूट्रिशन कायम राहते. मोहरीच्या तेलाला चांगले अँटीबॅक्टेरियल समजले जाते व हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करते. यापासून सर्व प्रकारच्या भाज्या बनवू शकता. सध्या रिफाइंड तेलाचा वापर वाढत असला तरीही रिफाइंड तेलाऐवजी घाण्याचे तेल खाणे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते असे आहार आणि आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.
आहारात तेलाचा अती होणारा वापर, कर्बोदकांचे अतिरिक्त प्रमाण आणि प्रथिनांची कमतरता आणि शून्य व्यायाम हेच सगळ्या आजाराचे मूळ आहे. प्रौढांच्या आहारात दोन ते तीन टीस्पून तेल असावे. स्त्री आणि पुरूष दोघांसाठीही हे प्रमाण सारखंच आहे. पण व्यक्तिपरत्वे तेलामध्ये बदल होऊ शकतो. निरोगी शरीर हवे असेल तर त्यासाठी तेल खूप महत्वाचे ठरते, त्वचा, केस आणि हाडे निरोगी ठेवण्यास तेल मदत करते. निरोगी शरीरासाठी एका दिवसात 3 ते 4 चमचे रिफाइंड तेलाचे सेवन करता येऊ शकते. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी.
Health Tips Refined Oil Use Cooking Daily