मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
नारळ या वृक्षाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते नारळाच्या झाडाचे अनेकविध उपयोग आहेत, त्यातही नारळ असे झाड आहे की, त्यापासून अनेक उपयोग करता येतात. आपल्या सर्वांना नारळाबद्दल माहिती आहे, पूजेपासून विविध प्रकारच्या मिठाईंमध्ये त्याचा वापर केला जातो. काही नागरिक शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून नारळाचे पाणी पितात, तर काहीजण चटणी बनवून खातात, पण कच्च्या नारळाचा तुकडा खाल्ल्याने काय फायदे होतात. चला जाणून घेऊ या…
नारळात आढळणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे त्याला आरोग्याचे भांडार म्हटले जाते. यात अँटी-व्हायरल, अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-परजीवी गुणधर्म आहेत, ते शरीराला संक्रमण आणि अनेक रोगांपासून वाचवतात. नारळाचे एक किंवा दोन तुकडे रोज खाल्ल्याने अनेक फायदे होतात.
बद्धकोष्ठता हा कमी फायबरयुक्त अन्न खाल्ल्याने होतो. अशा परिस्थितीत कच्चा नारळ फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळते, त्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. सकाळी पोट साफ होत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी नारळाचा तुकडा खा आणि झोपा.
कच्चा नारळ हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो कारण नारळामध्ये असलेली चरबी चांगली असते, ज्यामुळे शरीराचे कार्य योग्यरित्या होण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
झोपण्याच्या काही तास आधी नारळ खाल्ल्याने चांगली झोप येण्यास मदत होते. यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे स्नायूंना फायदा होतो आणि झोपही चांगली लागते.
नारळातील चरबीयुक्त घटक त्वचेचे पोषण करते, त्वचा हायड्रेट ठेवते आणि मऊ बनवते. त्याच वेळी, यामध्ये आढळणारे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म त्वचेला मुरुमांसारख्या समस्यांपासून दूर ठेवतात.
नारळातील फायबर शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास खूप मदत करते. याशिवाय कच्चे खोबरे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत करते.