मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
पावसाळा येताच आहारात काही बदल करायला हवेत. पावसाळ्यात हलका आहार घ्यावा, खाद्य पदार्थ ताजे गरम व हलक्या स्वरूपाच्या असावे असे म्हटले आहे. , असा उल्लेख आरोग्य शास्त्र विषयक प्राचीन ग्रंथात आढळतो. सध्या ताणतणावपूर्ण जीवनशैली आणि बदलत्या हवामानात सर्दी-खोकला आणि थंडी -तापाचा धोका वाढतो.
विशेषत: पावसाळ्यात डास चावल्यामुळे अनेक रोग पसरतात. यामध्ये डेंग्यू, मलेरिया, झिका विषाणू आणि चिकनगुनियाचा समावेश आहे. डेंग्यू आणि मलेरियाचा प्रतिबंध विशेषतः महत्वाचा आहे. प्रतिकार मजबूत करण्यासाठी डॉक्टर दररोज काढा पिण्याचा देखील सल्ला देतात. यासाठी आपण कांदा वापरू शकता. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याकरिता दररोज कांद्याचा काढा प्यायल्याने फायदा होतो
या ऋतूत टरबूज-कलिंगड आणि आंबा खाणे टाळावे. त्यांच्यापासून तुम्ही आजारी पडू शकता. जाणून घ्या पावसाळ्यात कोणती फळे खाऊ नयेत .पावसाळा सुरू झाला की आंब्याचा हंगाम शिगेला असतो. सुरुवातीच्या दिवसात तुम्ही आंबा खाऊ शकता, परंतु काही महिन्यांनंतर आंबा खाणे बंद करा.
पावसामुळे आंबा खराब होऊ लागला. यामध्ये बुरशी आणि बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे आंबा खाणे टाळावे.
कलिंगड हे सर्वात पाणीदार फळ आहे. उन्हाळ्यात कलिंगडापेक्षा चांगले फळ नाही, पण पावसात कलिंगड खाणे टाळावे.
या ऋतूमध्ये कलिंगडामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकते.
पावसात शरीराला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे, परंतु पावसाळ्यात पाणफळांचे सेवन टाळावे. पावसाळ्यात ही फळे लवकर दूषित होतात. तुम्ही ते खाल्ले तर तुम्ही आजारी पडू शकता. पावसाळ्यात हिरव्या भाज्या न खाण्याचा सल्ला दिला जातो. या भाज्यांमध्ये कीटक आणि बॅक्टेरिया वाढू लागतात. कधीकधी गलिच्छ पाण्यामुळे भाज्या दूषित होतात. यामुळे पचनसंस्थेत समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
Heath Tips Rainy Season Fruits don’t eat side effects