इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कधी आंबट-गोड तर कधी तिखट-मसालेदार असे अनेक पदार्थ गरोदरपणात महिलांना खाण्याची हौस असते. मात्र गरोदरपणात आईच्या आहाराचा थेट परिणाम तिच्या न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावर होतो. अशा परिस्थितीत, गर्भधारणेदरम्यान स्त्रिया आपली लालसा शांत करण्यासाठी मसालेदार अन्न खाऊ शकतात का, असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात सतावत असतो. मसालेदार अन्न खाल्ल्याने पोटातील बाळाच्या आरोग्याला खरोखरच हानी पोहोचते का? अशाच काही प्रश्नांची अचूक उत्तरे स्त्रीरोग तज्ज्ञांकडून जाणून घेऊ या…
प्रश्न : गरोदरपणात मसालेदार पदार्थ खाण्याची लालसा का असते?
उत्तर : गरोदरपणात बहुतेक महिलांना मसालेदार अन्न खावेसे वाटते. असे होण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांच्यामध्ये होणारे हार्मोनल बदल होय. याशिवाय खाद्यपदार्थांमधून येणारा सुगंध महिलांना मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा तीव्र करू शकतो.
प्रश्न : गर्भधारणेदरम्यान मसालेदार अन्न सुरक्षित आहे का?
उत्तर : गरोदरपणात मसालेदार पदार्थ टाळावेत, असे अनेकांचे म्हणणे तुम्ही ऐकले असेल. परंतु तज्ज्ञांच्या मते, गर्भधारणे दरम्यान, मसालेदार अन्न सेवन केल्याने बाळाला कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही. पण याउलट अतिमसालेदार पदार्थ खाल्ल्याने गर्भवती महिलेच्या पचनसंस्थेवर नक्कीच वाईट परिणाम होतो.
प्रश्न : अशा महिलांच्या पचनसंस्थेवर या पदार्थांचा कोणता परिणाम होऊ शकतो?
उत्तर : कोणत्याही गर्भवती महिलेला मसालेदार अन्न खाण्याची इच्छा तिच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे असते. स्त्रीच्या लालसेचा तिच्या मूल होण्याच्या इच्छेशी काहीही संबंध नाही. गर्भधारणे दरम्यान, महिलांना मसालेदार व बाहेरील अन्न खाण्यास मनाई आहे कारण त्याचा त्यांच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. गरोदरपणात पचनसंस्था खूप मंद गतीने काम करते, त्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही. या पदार्थांचे सेवन केल्याने अपचन आणि गॅसची समस्या वाढू शकते. त्यामुळे गर्भवती महिलांची औषधेही वाढतात.
प्रश्न : गर्भधारणेदरम्यान मसालेदार पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला का दिला जातो?
उत्तर : गरोदरपणात मसालेदार अन्न खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते. कारण गरोदरपणात मसालेदार पदार्थ पोटात आणि आतड्यांमध्ये दीर्घकाळ राहतात. त्यामुळे पोटातील अॅसिड पुन्हा अन्ननलिके मध्ये जाते आणि पोटात जळजळ होण्याची समस्या होऊ शकते.
अपचन – गरोदरपणात पचनसंस्था खूप मंद गतीने काम करते, त्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही. अशा परिस्थितीत मसालेदार पदार्थांचे सेवन केल्याने अपचनाची समस्या वाढू शकते.
उलट्या- अनेक महिलांना गरोदरपणात उलटीच्या समस्येने त्रास होतो. अशा परिस्थितीत, मसालेदार अन्न जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्यांची समस्या आणखी वाढू शकते.
गॅस- गरोदरपणात मसालेदार अन्न खाल्ल्याने गॅस आणि पोटफुगी होऊ शकते.मसालेदार अन्नामुळे इरिटेबल बोवेल सिंड्रोम होतो. त्यामुळे गॅस बनणे आणि पोट फुगणे अशा तक्रारी असू शकतात.
प्रश्न : गरोदरपणात मसालेदार पदार्थ खाताना काय खबरदारी घ्यावी?
उत्तर : गरोदरपणात मसालेदार अन्न खाण्यापूर्वी, जोडलेले मसाले प्रमाणित चांगल्या ब्रँडचे मसाले आहेत का, याची खात्री करा. जेणेकरून माता आणि न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही. जेवणात मसाले कमी वापरा.
जास्तीत जास्त घरी शिजवलेले अन्न खा. बाहेरचे अन्न खावेसे वाटत असेल तर चव चाखा, पण तल्लफ शांत करण्यासाठी पोटभर जेवू नका. अन्यथा महिलेला उलट्यांचा त्रास होऊ शकतो. जर मसालेदार खावेसे वाटत असेल तर लिंबू आणि काळ्या मीठाची मदत घ्या. मसाले घेताना त्यांची एक्सपायरी डेट नक्की पहा. सूटे मसाले खरेदी करणे टाळा. मात्र मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर पोटात जळजळ होत असेल तर त्याचे सेवन ताबडतोब बंद करा.