इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – आपल्या रोजच्या जेवणात अनेक भाज्या असतात बटाट्याची भाजी सर्वांना आवडते. बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जाते कारण सर्वांना बटाट्याचे पदार्थ खायला आवडतात.बटाट्याचा आकार गोल किंवा लंबगोल असतो. बटाट्याच्या सालीचा रंग पिवळसर असतो; आतील गर पांढऱ्या रंगाचा असतो. बटाट्यामध्ये प्रोटिन, फॉस्फरस, गंधक तसेच जीवनसत्त्व ए व सी असते. बटाट्यामध्ये कर्बोदकाचे प्रमाण जास्त असते. बटाट्याचे मूळ जन्मस्थळ दक्षिण अमेरिका आहे. भारतात बटाट्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. महाबळेश्वर, पुणे व मध्यप्रदेशात बटाटे मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जातात.
बटाट्याचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. बटाट्यापासून भाजी, समोसा, पॅटीस, वेफर्स, पापड, बटाटेवडा, भजी, पराठे (आलू पराठा), मिक्स भाजी, तसेच पावभाजी करतात. उपवासालाही बटाटे वापरले जातात. बटाट्यांमध्ये व्हि़टॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, झिंक आणि फॉस्फरसही आढळतं. तुमची त्वचा तजेलदार राहण्यासाठी हे घटक महत्त्वाचे ठरतात.
बटाट्यांमधलं व्हिटॅमिन सी तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. बटाट्यांमध्ये असलेलं फ्लॅवोनॉइड अॅन्टिऑक्सिडन्टसं तुम्हाला कॅन्सरपासून दूर ठेवतं. बटाट्यापासून भाजी, टिक्की, पकोडे इत्यादी विविध खास पाककृती बनवता येतात. बर्याच जणांना बटाटे इतके आवडतात की त्यांना प्रत्येक जेवणादरम्यान बटाट्याचा प्रत्येक प्रकार आवडता असतो. बटाट्याचे प्रकार करताना आपण साले फेकून देतो, परंतु बटाट्याच्या सालीमध्ये असलेल्या पोषक तत्वांबद्दल माहिती असेल तर ते पुन्हा फेकणार नाही.
आहारतज्ज्ञ सांगतात की, बटाट्याच्या सालीला पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. यात पोटॅशियम भरपूर आहे आणि लोह देखील भरपूर आहे. याशिवाय बटाट्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन बी ३ देखील भरपूर असते. बटाट्याची साल तुमच्या हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवते कारण त्यात उपस्थित पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमच्या मदतीने रक्तदाब नियंत्रित राहतो.भारतात हृदयरुग्णांची संख्या खूप जास्त आहे. तर बटाट्याची साल अनेकांना उपयोगी पडू शकते. बटाट्याच्या सालीमध्ये भरपूर फायटोकेमिकल्स असतात, जे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतात. यासोबतच या सालींमध्ये क्लोरोजेनिक अॅसिड देखील आढळते. ज्यामुळे कॅन्सरचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. बटाट्याच्या सालीमध्ये कॅल्शियमसारखे अनेक महत्त्वाचे खनिजे असतात, त्यामुळे ते नैसर्गिकरित्या हाडे मजबूत करण्याचे काम करतात.
Health Tips Potato Peel Nutrition Benefits