लखनऊ – सध्याच्या काळात प्राणघातक कोरोना संसर्ग वाढल्यामुळे रूग्णाच्या फुफ्फुसांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे त्यांचे जिवन संकटात सापडले असून नातेवाईक देखील त्रस्त आहेत. त्यातच ऑक्सिजन सिलिंडर शोधण्यात आणि रुग्णालयात बेड मिळवण्यात इतका वेळ वाया जातो की, बहुतेक रुग्ण उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यूमुखी पडत आहेत. यावर उपाययोजना म्हणून सूप प्यायल्यावर ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते.
कोरोनामुळे सर्वत्र रुग्णांचे मृत्यू होत असून नातेवाईकांची असहायता दिसत आहे. तथापि, रुग्णांवर आपल्या घरातच घरगुती उपचार होऊ शकतात. कारण काही तज्ज्ञांच्या मते पालक आणि बीट सूप कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होऊ देत नाहीत. ते पिण्यामुळे फुफ्फुसांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे कोरोनावर जोरदारपणे मात करता येते.
अनेक कोरोना रूग्णांच्या यशस्वी उपचार करणारे लोहिया संस्थेचे आयुर्वेद प्राध्यापक डॉ. एस. के. पांडे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. डॉ. पांडे म्हणतात की, अॅलोपॅथमधील कोरोनाच्या उपचारात रुग्णांना दिले जाणारे जस्त, व्हिटॅमिन बी-१२, व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम इत्यादी पालक आणि बीटरूटमध्ये नैसर्गिकरित्या उपस्थित असतात. यात लोह आणि नायट्रस ऑक्साईड देखील समृद्ध आहे.
लोहामधून बाहेर पडलेल्या नायट्रस ऑक्साईडमुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. यामुळे फुफ्फुसांना भरपूर ऑक्सिजन मिळतो. तसेच, त्याच्या सूपमध्ये लाल रक्तपेशी (आरबीसी) आणि पांढऱ्या रक्त पेशी (डब्ल्यूबीसी) वाढतात. हे कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती मजबूत करते.









