पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात प्रत्येक जण आरोग्याची काळजी घेत असताना योग्य आहाराकडे लक्ष देत असतो, तरी चटपटीत खाणे बहुतांश जणांना आवडते. त्यामुळे अनेक जणांना भेळ, शेव-चिवडा, रागडा पॅटीस, पाणीपुरी असे पदार्थ खुप आवडतात. त्यातही पाणीपुरी खाणे प्रत्येकालाच आवडते. मग कोणी लहान असो वा मोठे असो. पाणीपुरी हे सर्वात आवडते स्ट्रीट फूडपैकी एक आहे. मात्र आरोग्याची काळजी घेत काही जण पाणीपुरी खाणे टाळतात. विशेष म्हणजे, पाणीपुरी खाण्याचे खुप सारे फायदे आहेत. हे वाचून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण वास्तविक पाणीपुरी अतिरिक्त चरबी कमी करण्यास उपयुक्त आहे. कसे ते जाणून घेऊ या.
भूक लागत नाही
लठ्ठपणाचा त्रास असलेल्या नागरिकांसाठी पाणीपुरी हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. वजन कमी करायचे असेल तर. मग पाणीपुरी मदत करू शकते. खरेतर पाणीपुरीचे पाणी खूप मसालेदार असते, ते खाल्यानंतर तासन्तास भूक लागत नाही.
घरी बनवलेले खा
अनेक आहारतज्ज्ञ असे सुचवतात की, पाणीपुरी वजन कमी करण्यास मदत करते. मात्र ते घरी बनवल्यावरच खावे. यासोबतच जलजिऱ्याचे पाणीही वापरता येते.
पाण्याचे फायदे
घरगुती पाणीपुरीच्या पाण्याचे अनेक फायदे आहेत. पुदिना, जिरे आणि हिंग यांचे पाणी तयार केल्यास. मग ते पचनासाठी चांगले असते. यामध्ये कोथिंबिरीचाही वापर करता येतो. हिंगामुळे वेदना कमी होतात.
हे लक्षात ठेवा
पाणीपुरीची गोड चटणी खाणे टाळावे. वजन कमी करायचे असेल तर साखर अजिबात घेऊ नका. पाणीपुरीमध्ये गोड पाण्याऐवजी पुदिन्याचे पाणी घालून खा. त्यात हिंग, मिठ आणि जिरे वापरा. रव्याऐवजी पिठाची पाणीपुरी खा.