मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याच्या काळात भारतामध्ये पनीर हा पदार्थ सर्व लोकांना खाण्यासाठी आवडतो. आजकाल पंजाबी डिशेस सर्वत्र खाण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. गृहीणी घरी पनीरची भाजी करतात, इतकेच नव्हे तर कुणी हॉटेल मध्ये गेले की, भाजी ऑर्डर करायची असेल तर पनीरची भाजी मागवली जाते. त्यामुळे दिवसेंदिवस पनीर हा पदार्थ खूपच लोकप्रिय व्हायला लागला आहे. युट्युबवर भरपूर प्रकारच्या रेसिपीज बघून प्रत्येक घरामध्ये या रेसिपीज बनवल्या जातात. काही सुगरण गृहीणीकडून पनीरची भाजी घरच्या घरी चांगल्या प्रकारे बनवली जाते.त्यामुळे पनीरच्या भाज्यांचे वेगवेगळे प्रकार देखील घरात बनवले जातात. अशा रीतीने पनीर हे सध्या खूप लोकांमध्ये लोकप्रिय होऊ लागले आहे.फ्रिजमध्ये ठेवले पनीर पिवळे दिसू नये म्हणून काय करावे? पनीर ताजे फ्रेश कसे राहील? त्याकरीता काय युक्ती वापरावी हे जाणून घ्या….
दीर्घकाळ टिकण्यासाठी
दुग्धजन्य पदार्थांपेक्षा पनीरमध्ये अधिक पोषण मूल्य असते. गरम दुधात सायट्रिक आम्ल मिसळल्यानंतर साकाळून वेगळे झालेले हिरवे पाणी (व्हे) काढून शिल्लक राहिलेल्या साक्यास दाब देऊन घट्ट केलेला पदार्थ म्हणजेच पनीर होय. पनीर तयार करण्यासाठी तुम्ही दुधाचे पनीर वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. प्रथम तुम्हाला दूध उकळून घेऊन त्यामध्ये लिंबूचा रस टाकला जातो आणि ते दूध चांगले हलवले जाते नंतर थोड्या वेळाने त्यामधील पनीर आणि दूध वेगळे होते. नंतर पाणी आणि पनीर वेगळे केले जाते. आणि हे पनीर एका फडक्यामध्ये बांधून पूर्ण पाणी नितळण्यासाठी दाबून ठेवले जाते. अशा रीतीने अगदी सोप्या पद्धतीने हे पनीर तयार केले जाते. पनीर पाण्यांत भिजवून ते स्टोअर करताना ते हवाबंद डब्यांत स्टोअर करणे टाळावे. पनीर पाण्यांत भिजवून ठेवल्यावर त्यावर हलकेच झाकण ठेवावे किंवा एखाद्या सुती कापडाने झाकून घ्यावे परंतु गच्च झाकण लावणे टाळावे. याचबरोबर जर आपल्याला हे पनीर २ ते ३ आठवड्यापर्यंत फ्रेश ठेवायचे असल्यास दर २ ते ३ दिवसांनी त्यातील पाणी बदलत राहावे. यामुळे पनीर दीर्घकाळ फ्रेश राहते.
आठवडाभर टिकण्यासाठी
‘पनीर’ हा दुधापासून तयार केला जाणारा शाकाहारी पदार्थ आहे. पनीर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. पनीर हे फक्त चवदारच नसून ते आपल्या आरोग्यासाठीही खूप जास्त फायदेशीर असते. नासलेल्या दुधापासून बनविण्यात येणारा हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असलेले हे पनीर आहारात असायला हवे म्हणून आपण अनेकदा आणतो. मात्र आपण एकावेळी आणलेले पनीर लगेच संपतेच असे नाही. अशावेळी हे राहीलेले पनीर फ्रिजमध्ये कसे स्टोअर करुन ठेवायचे अस प्रश्न पडतो. हे पनीर थोडे जरी उघडे राहीले तर ते कडक होते मात्र या सोप्या युक्तीमुळे पनीर आठवडाभर नीट टिकून राहते.एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये पनीर ठेवले तर चांगले ८ दिवस टिकून राहते. तसेच पिवळे पडत नाही, त्यामुळे आपल्याला पनीर काही दिवसांनी वापरायचे असेल तरी आपण ते एकदम फ्रेश असल्यासारखे वापरु शकतो. पनीर पाण्यांत भिजवून ठेवताना पनीरच्या तुकड्यापेक्षा अधिक पाणी त्यात असावे म्हणजेच पनीर संपूर्णपणे पाण्यांत भिजेल असे ठेवावे, असे जाणकार सांगतात.
What should be done to keep the cheese from looking yellow in the fridge?
Health Tips Paneer Fresh Fridge Storage Kitchen