पुणे – आजच्या काळात लठ्ठपणा ही अनेकांना सर्वात गंभीर समस्या वाटत आहे. जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे दरवर्षी ४ दशलक्षाहून अधिक लोक मरतात. प्रौढ आणि अगदी लहान मुलांमध्ये जास्त वजन आणि लठ्ठपणाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. ही समस्या इतकी भयानक आहे की, लठ्ठपणा हा हृदयरोग आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजारांसह अनेक रोगांसाठी एक प्रमुख जबाबदार घटक ठरत आहे, तसेच जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे, असे मत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.
आहार आणि आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. विशेषत: रात्री बाहेर खाणे आणि चटपटीत गोष्टी खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे सहाजिकच लठ्ठपणा वाढतो. या परिस्थितीत रात्रीच्या वेळी कोणत्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे. ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल हे जाणून घेऊ या.
दही
दहीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असून ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यात असलेले प्रथिने स्नायूंना बळकट करण्याचे काम करतात, त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक कप दही खाल्ले तर ते वजन किंवा लठ्ठपणा कमी करण्यास खूप मदत होते.
काकडी
तज्ज्ञ म्हणतात की, रात्रीचे जेवण खूप हलके असावे. त्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी सॅलड आणि सूप उत्तम ठरतात. आपण काकडीचे सॅलडच्या स्वरूपात सेवन करू शकता. त्यामुळे पोट लवकर भरते आणि सहज पचते. तसेच लठ्ठपणा कमी करण्यात खूप मदत होते.
ओट्स
ओट्स हे आरोग्यदायी आणि पोषक पदार्थांपैकी एक मानले जातात. यात भरपूर फायबर आणि चरबी कमी असते. यामुळे ते लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. बहुतेक लोकांना वाटते की ओट्स फक्त सकाळी नाश्त्यात खावेत, मात्र आहार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रात्रीच्या वेळी तुम्ही कोणत्याही काळजीशिवाय ओट्सचे सेवन करू शकता.
बदाम
बदामांमध्ये चांगल्या प्रमाणात फायबर आढळते. त्यामुळे ते खाल्ल्यानंतर, एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ भूक लागत नाही. तसेच त्याचे सेवन लठ्ठपणा कमी करण्यास मदत करू शकते. आपण रात्री देखील याचे सेवन करू शकतो. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रात्री बदाम खाल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होतेच, शिवाय झोप आणि त्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
(महत्त्वाची सूचना : इंडिया दर्पण मधील आरोग्य आणि फिटनेस श्रेणीमध्ये प्रकाशित झालेले सर्व लेख आणि बातम्या या तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय शैक्षणिक संस्थांशी संवाद साधून तयार केले जातात. मात्र यात नमूद केलेली तथ्ये आणि माहिती केवळ वाचकाचे ज्ञान आणि जागरूकता वाढवण्यासाठी तयार केलेली असते. तसेच अधिक माहितीसाठी किंवा कोणत्याही रोगाबद्दल अधिक तपशीलांसाठी आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा.)