विशेष प्रतिनिधी, नागपूर
अलीकडच्या काळात विस्कळीत दिनचर्या, अचकल बचकल खाणे आणि तणावामुळे मायग्रेनची समस्या अतिशय सामान्य होऊन बसली आहे. या आजारात फार जास्त प्रमाणात डोके दुखत असते. बराच वेळ ही डोकेदुखी सहन करावी लागते. पण या माग्रेनमध्येही दोन प्रकारचे त्रास आहेत. एक तर आभासी मायग्रेन आणि दुसरा वास्तविक मायग्रेन.
मायग्रेन होण्याची कारणे खूप आहेत. यात मानसिक ताण, नसा ताणल्या जाणे, थकवा, रक्ताची कमी, सर्दी-खोकला आदींचा यात समावेश आहे. या आजाराचा उपचार आहे, मात्र निष्काळजीपणा केल्यास हा आजार धोकादायक ठरू शकतो. योग तज्ज्ञ मात्र मायग्रेन दूर करण्यासाठी सूर्य नमस्कार, योगमुद्रा, शशांकासन, पवनमुक्तासन, सर्वागासन, हलासन, मत्स्यासन करण्याचा सल्ला देतात. तुम्ही सुद्धा मायग्रेनच्या त्रासाने त्रस्त असाल तर दररोज योगासने करा.
मत्स्यासन करा
मत्स्यासन हा मत्स्य अर्थात मासोळी आणि आसन हे दोन शब्द मिळून तयार झाला आहे. थोडक्यात सांगायचे तर मासोळीच्या मुद्रेत राहणे म्हणजे मत्स्यासन करणे होय. हा योग केल्याने मायग्रेनचा त्रास कमी होतो. त्यासाठी समतल जमीनीवर पाठीच्या भारावर लोटून राहावे. त्यानंतर आपले दोन्ही पाय जवळ ओढायचे. आता हळूहळू आपले धड वरच्या दिशेने उचला. या मुद्रेवर काही वेळ तसेच राहा. त्यानंतर मुळ मुद्रेवर कायम या.
सेतू बंधासन करा
हा योग केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच मायग्रेनमधूनही आराम मिळतो. ताण आणि चिंतेतूनही मुक्ती मिळते. यातून मेंदूला रक्त पुरवठा योग्यरित्या होतो, त्यातून मायग्रेनची समस्या दूर होते.