पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात धावपळ आणि ताण-तणाव यामुळे अनेक नवनवीन आजार उद्भवतात, त्यातच सेल्स, मार्केटिंग आणि नर्सिंग सारख्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील व्यक्तींना अनेकदा पायांमध्ये तीव्र वेदना आणि मुंग्या येण्याची तक्रार करतात. हे काही आजाराचे लक्षण आहे का? हे व्हेरिकोज व्हेन्स नावाच्या आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ या. व्हेरिकोज व्हेन्स नावाच्या आजारात अशुद्ध रक्त रक्तवाहिन्यांद्वारे हृदयापर्यंत पोहोचते, जे पंपिंग प्रक्रियेद्वारे स्वच्छ होते आणि हृदय रक्तवाहिन्यांद्वारे शरीराच्या इतर भागांमध्ये पोहोचते. प्रत्येक ठोक्यानंतर हृदय रिकामे होते आणि पुढच्या ठोक्यात परत रक्ताने भरते. ही प्रक्रिया सतत चालू राहते, परंतु सतत उभे राहिल्याने हृदयाला अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या नळ्या फुगतात, त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि त्यात अशुद्ध रक्त साचते.
व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणे
व्हेरिकोज व्हेन्सकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे स्वरूप गंभीर होण्याची आणि वेदना, दाह वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे रुग्णाला दैनंदिन कामे करणे,चालणे, उभे राहणे कठीण होते, या समस्येवर वैद्यकीय उपचार असले तरी व्हेरिकोज व्हेन्स घरगुती उपाय करून ही समस्या नियंत्रणात आणता येते. एखाद्या व्यक्तीच्या पायातील रक्तवाहिन्या सुजून मोठ्या होतात तेव्हा या समस्येला व्हेरिकोज व्हेन्स असे म्हणतात. काही जणांना यामुळे प्रंचड वेदना आणि दाह सहन करावा लागतो.
व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय?
पायातील रक्तवाहिन्यांमधील झडपा कमजोर झाल्यामुळे होणाऱ्या समस्येला व्हेरिकोज व्हेन्स असं म्हणतात. या झडपांमधून रक्तवाहिन्यांमध्ये मागच्या दिशेला वाहणारे रक्त नियंत्रित केले जाते. मात्र जेव्हा रक्तवाहिन्यांमधील झडपा कमजोर होतात तेव्हा ते रक्त पुन्हा मागच्या दिशेला वाहतं आणि खराब होऊन रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतं. ज्यामुळे पायाच्या शिरा सूजतात आणि फुगून मोठ्या होतात. त्या एवढ्या वाढतात की त्या चक्क पायाच्या त्वचेमधून बाहेर आल्या आहेत हे दिसू शकतात.
काही प्रमुख लक्षणे :
– पायाच्या शिरा निळ्या जांभळ्या होणे,
– पायाच्या शिरा फुगून मोठ्या होणे,
– पाय आणि पावलावर सूज येणे,
– व्हेरिकोज व्हेन्सवरील त्वचा कोरडी होणे आणि दाह होणे,
– सतत पायामधून वेदना आणि जळजळ जाणवणे.
– पाय खूप दड होणे आणि चालताना त्रास जाणवणे .
– खूप वेळ एकाच ठिकाणी उभे राहणे कठीण वाटणे.
– रात्रीच्या वेळी पायात सतत मसल क्रॅम्प येणे.
टाळण्यासाठी हे आहेत उपाय
– अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींचा नसा टाळण्यासाठी खालील बाबी आवर्जून कराव्यात…
– दर दोन तासांनी ब्रेक घ्या आणि पाच ते दहा मिनिटे बसा. या दरम्यान, खुर्चीवर बसा आणि थोडावेळ आपले पाय हलके स्ट्रेचिंग करा.
– रात्री झोपताना पाय उंच उशीवर ठेवा, यामुळे अशुद्ध रक्त हृदयापर्यंत पोहोचणे सोपे होईल. अशा समस्येने ग्रस्त असलेल्याना ग्रेडेड कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज घालण्याचा सल्ला दिला जातो.
– विशेष तंत्रज्ञानाने बनवलेले हे स्टॉकिंग्ज पायांमध्ये डीऑक्सीजनयुक्त रक्त जमा होण्यास प्रतिबंध करतात आणि रक्त प्रवाह देखील सुलभ करतात.
– सर्व प्रयत्न करूनही वेदना आणि सूज यासारख्या समस्या असल्यास, विलंब न करता हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी सर्जनचा सल्ला घ्या.
– विविध प्रकारच्या उपचारानंतर ही समस्या दूर होते.
– गंभीर प्रकरणांमध्ये, शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते.
– या समस्येला तुम्ही नियंत्रणात ठेवू शकता. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. पायाच्या रक्तवाहिन्यांना रक्ताचा योग्य प्रमाणात पूरवठा होतो.
– व्यायामामुळे रक्तवाहिन्यांमध्ये साठलेले दूषित रक्त पुढे ढकलण्यास मदत होते. व्यायमामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्याचा व्हेरिकोज व्हेन्स असलेल्याना चांगला फायदा मिळतो. व्हेरिकोज व्हेन्समधून आराम मिळणय्यासाठी पोहणे, चालणे, सायकल चालवणे, योगासने करणे अशा प्रकारचे व्यायाम करणे फायदेशीर ठरते. तसेच व्हेरिकोज वेन्सवरील बेस्ट उपाय काही किलोंनी तुमचे वजन कमी करणे हा होय.
आहारामध्ये बदल
आहारामध्ये काही बदल करूनही व्हेरिकोज व्हेन्समध्ये फायदा होऊ शकतो. जसं की, सोडियमयुक्त पदार्थत खाण्यामुळे तुमचा त्रास जास्त वाढू शकतो. यासाठी आहारातून मीठ कमी करावे. काही पदार्थांमध्ये जास्त पोटॅशिअम आहे असे पदार्थ तुम्ही नक्कीच खाऊ शकता. उदा. पालेभाज्या, बदाम, बटाटा, मासे. त्याचप्रमाणे सुपरसीड्स, ओट्स, अळशी, तृणधान्ये खाण्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे फायबर्स मिळतात. तुमचे वजन नियंत्रित राहते आणि पायातील वेदना कमी होतात.फ्लेव्होनॉईडमुळे तुमचा रक्तदाबही नियंत्रित राहण्यास मदत होते. यासाठी आहारात, कांदा, पालक, ब्रोकोली, चेरीज, सफरचंद, द्राक्षे, लसूण याचा समावेश वाढवावा.