पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपले आरोग्य ही आपली संपत्ती मानली जाते, परंतु काही कारणाने आरोग्य बिघडते आणि आजार उद्भवतात. त्यातच किडनी स्टोन म्हणजे मुतखड्याचा आजार हा एक भयानक तथा कठीण आजार मानला जातो. त्याची लक्षणे व कोणती व उपाययोजना काय हे जाणून घेणे आवश्यक ठरते. मुतखड्याचा उपचार हा त्याचा आकार आणि तो मूत्रमार्गाच्या कुठल्या भागात स्थित आहे, यावर अवलंबून असतो. सामान्यतः मूत्रपिंडात, युरेथ्रामध्ये अथवा लघवीच्या पिशवीत असलेले ७ ते ८ मिलीमीटरपेक्षा लहान मुतखडे औषधांनी गळून जातात. मात्र, हे खडे बाहेर निघून गेलेत, याची पुष्टी करण्यासाठी सोनोग्राफी करणे गरजेचे असते.
खरे तर हा त्रास होऊ नये यासाठी आधीच याची लक्षणे काय असतात याकडे लक्ष देणे फायद्याचे ठरेल. जेणेकरुन वेळेवर उपचार घेऊन ही समस्या दूर करता येईल. किडनी स्टोन झाल्यावर काय दिसतात लक्षणे, यांकडे दुर्लक्ष करणं कसे महागात पडू शकते, हे समजून घ्यावे. खाण्या-पिण्यातील अनियमीतता आणि आवश्यक तेवढं पाणी न पिणे हे किडनी स्टोन होण्याचं मुख्य कारण आहे. मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन अनेकांना होतो पण काहींच्या किडनीमध्ये तयार झालेला स्टोन सहज बाहेर पडतो.
काहींचा स्टोन मोठा असल्याने तो बाहेर पडण्यास अडचणी येतात. त्यामुळे काही लोकांना फार जास्त त्रास सहन करावा लागतो. खरंतर हा त्रास होऊ नये यासाठी आधीच याची लक्षणे काय असतात याकडे लक्ष देणे फायद्याचे ठरेल. जेणेकरुन वेळेवर उपचार घेऊन ही समस्या दूर करता येईल. किडनी स्टोनमुळे पाठीच्या खालच्या भागात फार जास्त वेदना होतात. हा त्रास काही तास किंवा काही मिनिटांसाठीही होऊ शकतो. यात वेदना होण्यासोबतच जीव मळमळणे किंवा ओमेटींगही होऊ शकते. खूप जास्त घाम येणे, लघवी करताना त्रास होणे असेही प्राथमिक लक्षणे आहेत.
किडनी स्टोनची समस्या असणाऱ्या लोकांना नेहमी गुलाबी, लाल रंगाची लघवी येऊ लागते. आणि स्टोनचा आकार वाढल्याने मूत्रमार्ग ब्लॉग होतो. किडनी स्टोन झालेल्या लोकांच्या लघवीतून कधी कधी रक्तही येतं. किडनी स्टोनने ग्रस्त लोकांना सतत त्रास होण्यासोबत लघवीला जावं लागतं. असं किडनी स्टोन मूत्रमार्गातून मूत्राशयात गेल्यावर होतं. ही गोष्ट फारच त्रासदायक असते. यामुळे असह्य असा त्रास होतो.
तीव्र वेदना होणं ही कि़डनी स्टोनने ग्रस्त लोकांसाठी सामान्य बाब आहे. खासकरुन कंबर आणि कबंरेखालील भागात खूप जास्त असह्य वेदना होतात. या वेदना काही मिनिटांसाठी किंवा काही तासांसाठीही होऊ शकतात. पोटात कसंतरी होणे आणि मळमळ होणे हे किडनी स्टोनचे सुरुवातीचे संकेत आहेत. अनेकदा ओमेटींगही होते. किडनी स्टोन झाल्यास लघवीचा रंग लालसर येतो आणि दुर्गंधीही येते.
किडनी स्टोन वाढल्याने त्या भागात वेदना होऊ लागतात. त्यामुळे त्या लोकांना बसायला त्रास होतो. इतकेच काय तर ते कधी कधी आरामात झोपूही शकत नाही. किडनी स्टोनमुळे अनेकदा ताप येणे, थंडी वाजणे या समस्याही होतात. अशावेळी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मोठ्या आकाराचे स्टोन हे मूत्रमार्ग ब्लॉक करतात. त्यामुळे किडनीवर वेदना देणारी सूज येते. त्यासोबतच पोट आणि कंबरेच्या भागातही सूज येते.
इकडे लक्ष द्या
– अधिक काळ लघवी रोखून धरू नका.
– मूत्रमार्गावर संसर्ग झाल्यास वेळेत उपचार करा.
– नियमित व्यायाम करा.
– मीठ, टोमॅटो, पालक, चवळी, कोबी, वांगे, मांसाहारी पदार्थ, काजू, चॉकलेट, कोको, कॉफी हे मुतखडा निर्मितीला पुरक असे पदार्थ आहेत. त्यांचे सेवन कमी करावे.
– नारळाचे पाणी, लिंबाचे सरबत, काकडी, गाजर, अन्य भाज्या, केळी, अननस, पपई आणि इतर फायबरयुक्त पदार्थ मुतखडा टाळण्यासाठी उपयुक्त असतात.
– दिवसभरात बारा ते सोळा ग्लास म्हणजे तीन ते चार लिटर पाणी प्यावे.
Health Tips Kidney Stone Symptoms Remedies