ठाणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – बेली फॅट एक्सरसाइज म्हणजेच हुला हूप हा एक व्यायाम आहे. ज्याला आपण गोल रिंगचा व्यायाम म्हणतो तोच. या व्यायामात शरीराभोवती आपण हुला हूप म्हणजेच गोल रिंग फिरवतो. तसेच ही एक चांगली कसरत आहे. यात सर्वात चांगला भाग असा आहे की ते घरामध्ये किंवा बाहेर कुठेही केले जाऊ शकते.
आपण जर हुला-हूपचा व्यायाम योग्य पद्धतीने केलात तर फार कमी दिवसात पोट, हात आणि नितंबांची चरबी कमी करू शकता. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते करण्याचा योग्य मार्ग जाणून घेणे आणि शिकणे. त्यामुळे आज आपण अशा दोन व्यायामांबद्दल जाणून घेणार आहोत.ॉ
मूलभूत हुला-हूप व्यायाम
– दोन पायांमध्ये खांद्याइतके अंतर ठेवा आणि शरीराचा वरचा भाग सरळ ठेवा.
– हुला-हूप दोन्ही हातांनी धरून, कंबरेमध्ये घाला आणि प्रथम उजवीकडे फिरवा. कंबरही फिरवायची असते.
– सुरुवातीला, हे परिपूर्ण मार्गाने होऊ शकत नाही, परंतु हळूहळू ते योग्य मार्गाने होऊ लागेल.
– पायांमध्ये अंतर ठेवा आणि खालचे शरीर सरळ ठेवा.
-सुमारे 5 सेकंद एक बाजू फिरवा नंतर बाजू बदला म्हणजे डावीकडून करा.
= फायदे: हा हुला हुप व्यायामाचा सर्वात सोपा व्यायाम आहे. त्यामुळे पोटाची चरबी तर कमी होतेच पण लव हँडल म्हणजेच कंबरेवर साठलेली चरबीही कमी होते. abs तयार करण्यास मदत करते.
रोलिंग रीच हुला हूप :
– या व्यायामासाठी, हूला हूप (गोल रिंग) समोर ठेवा.
– शरीरापासून काही अंतरावर जमिनीला स्पर्श करत राहा.
– पाय आणि खांदे यांच्यामध्ये अंतर ठेवावे तसेच खांदे सरळ असावेत.
– आता तुमचा हुला हुप उजवीकडे फिरवून एक रोटेशन पूर्ण करा.
– नंतर डावीकडे अशाच पद्धतीने व्यायाम करत राहा.
= फायदे: रोलिंग रिच हुला हूप व्यायाम कंबर आणि पायांसाठी एक उत्तम व्यायाम आहे. यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि अतिरिक्त चरबी निघून जाते व तुमच्या शरीराला चांगल्या प्रकारे आकार मिळू शकतो