वॉशिंग्टन – भारतीय अन्नपदार्थांमध्ये दुधाला प्राचीन काळापासून महत्त्वाचे स्थान आहे. दूध हे सर्वांसाठी आरोग्यदायी मानले जाते. आता दुधाच्या फायद्यांविषयी अधिक व्यापक अभ्यास केला गेला असून सुमारे २० लाख लोकांवर केलेल्या या अभ्यासात असे आढळले आहे की, नियमितपणे दूध पिल्याने कोलेस्टेरॉलच्या पातळीत वाढ होत नाही. इतकेच नव्हे तर दुसर्या एका अभ्यासानुसार असेही आढळले आहे की, ज्यांनी नियमितपणे दूध सेवन केले, त्यांच्यामध्ये हृदयरोगाचा धोका १४ टक्के कमी होता.
दूधासंबंधीचा हा अभ्यास लठ्ठपणाच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. तीन मोठ्या गटाच्या लोकसंख्येवर केलेल्या या अभ्यासानुसार, ज्यांनी जास्त प्रमाणात दूध घेतले त्यांनाही चांगले आणि वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी आढळले. संशोधकांच्या पथकाने अनुवंशिक दृष्टीकोनातून दुधाचे पचन तपासले आहे. दुग्धशर्करा, ज्यांना लैक्टोज म्हणून ओळखले जाते, त्यांच्या पाचक दुग्धशर्करा जनुकमध्येही फरक असल्याचे आढळले आहे.










