इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाणी म्हणजे जीवन होय. पशुपक्षी असो की कोणताही सजीव पाण्यावाचून जिवंत राहणार नाही, विशेष म्हणजे मानवी जीवनात पाण्याचे अत्यंत महत्त्व आहे. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी आणि पोषक तत्व शरीरात पोहोचवण्यासाठी पाण्याची गरज असते. त्याच बरोबर शरीरात उर्जा टिकवून ठेवण्यासाठी देखील पाणी खूप महत्वाचे आहे.
आयुर्वेदानुसार प्राचीन भारतीय वैद्यक व्यवस्थेत असे सांगितले आहे की, काही गोष्टींची काळजी घेतली. तरच पुरेसे पाणी पिण्याचे फायदे मिळू शकतात. काही जण दिवसभर केवळ एक -दोन ग्लास पाणी पितात, त्यांना हळूहळू आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होऊ लागतात. तसेच चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने प्रथम पचनक्रिया बिघडते.
पचन बिघडते
पोषक तत्वांच्या शोषणासाठी अन्नाचे योग्य पचन होणे अत्यंत आवश्यक आहे. जेवण सुरू करण्यापूर्वी जास्त पाणी पितात किंवा जेवणा दरम्यान कमी प्यायले तर ते पचन बिघडू शकते. आयुर्वेदानुसार असे केल्याने त्याचा थेट परिणाम पोटातील अन्नाच्या स्थितीवर होतो. जेवताना नियमित पाणी प्यायल्यानेही लठ्ठपणा येऊ शकतो.
हे लक्षात ठेवा
सर्व प्रथम, एका वेळी एक ग्लास पाणी पिऊ नका. हळू हळू पाणी प्या. अन्न खाण्यापूर्वी किंवा नंतर कधीही पाणी पिऊ नका. त्यामुळे पचन सिस्टीमला अन्नातून पोषक तत्वे पचणे आणि शोषून घेणे कठीण होते. तहान लागली असेल तर जेवणाच्या ३० मिनिटे आधी पाणी प्या किंवा जेवणानंतर ३० मिनिटे थांबा, मग पाणी प्या.
गरम पाणी
अन्न खाताना तहान लागल्यास एक ग्लास पाणी नव्हे तर १ ते २ घोट पाणी घ्या. अन्नाचे योग्य पचन होण्यासाठी गरम पाणी प्या. एका ग्लास थंड पाण्यापेक्षा गरम पाणी जास्त हायड्रेटिंग असते.
उभे राहून नको
बहुतेक जण कुठेतरी जाण्यात व्यस्त असतात. अशा वेळी ते उभे राहून पाणी पितात. मात्र उभे राहून पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. आपण उभे राहून पाणी पितात, तेव्हा ते तुमच्या शरीरातून सहज निघून कोलनपर्यंत पोहोचते. यामुळे मूत्रपिंड आणि मूत्राशयातून विषारी पदार्थ जमा होतात.