पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात बहुतांश व्यक्तींची समस्या म्हणजे केस गळती. केस गळती थांबवण्यासाठी आहारात योग्य घटकांचा समावेश असावा. तसेच उत्तम प्रतीचे तेल केसांना लावावे. नैसर्गिक घरगुती उपचारांमुळे शरीरात लोहाची कमतरता दूर होईल, काही दिवसांतच फरक दिसून येईल. तसेच आपण ओल्या केसांना कंगवा करत असाल तर त्वरित ही सवय थांबवा. कारण असे केल्याने केस कमकुवत होतात आणि ते खराब होण्याची अधिक शक्यता असते.
हल्ली केसांच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत. त्यातही केस गळण्याचं आणि अकाली पांढरे होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. अगदी तरुण वयातल्या मुला- मुलींचे केस पांढरे होताना दिसत आहेत. तर काही जणांचे केस खूपच जास्त गळत आहेत. या तक्रारींवर उपाय म्हणून आपण जास्वंदाचा चहा घ्या, असा सल्ला आहारतज्ज्ञ यांनी दिला आहे. हा चहा कसा करायचा आणि जास्वंदाचा केसांसाठी कसा उपयोग होतो, याची माहिती जाणून घेऊ या..
आयुर्वेदानुसार असं सांगितलं जातं की अंगातली अतिरिक्त उष्णता हे केस गळण्याचं एक कारण असू शकतं. त्यामुळे अंगातली उष्णता कमी करण्यासाठी जास्वंदाचा उपयोग होऊ शकतो. जास्वंदामुळे शरीरातील पित्त दोष कमी करण्यासाठी आणि शरीरातला दाह कमी होण्यासाठी मदत होते. त्याचा चांगला परिणाम आपोआपच केसांच्या वाढीवर दिसून येतो. जास्वंदाच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन सी आणि ॲण्टीऑक्सिडंट्स यांचे प्रमाण भरपूर असते. जास्वंदामध्ये असणारे फ्लॅवोनॉईड्स आणि अमिनो ॲसिड केसांची चांगली वाढ होण्यासाठी मदत करतात.
जास्वंदाचा चहा करण्यासाठी सगळ्यात आधी जास्वंदाचं एखादं फ्रेश फुल तोडून घ्या. शक्यतो लाल रंगाच्या गावरान जास्वंदाचा उपयोग हा चहा करण्यासाठी करावा. यानंतर एक वाटी पाण्यात जास्वंदाच्या पाकळ्या १० मिनिटांसाठी भिजत घाला. यानंतर एका पातेल्यात कडक पाणी घ्या. त्यात जास्वंदाच्या या भिजवलेल्या पाकळ्या आणि १ टी स्पून हिरवा चहा टाका. हे मिश्रण हलवा आणि १० मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर हा चहा गाळून घ्या आणि गरम असतानाच पिऊन घ्या. हा उपाय काही दिवस नियमित केल्यास केसगळती कमी होईल.
आजच्या काळात केस पांढरे होणे व केस गळतीची समस्या अनेकांना जाणवते. विशेषतः तरुण-तरुणींना केस पांढरे होणे केस गळणे अशा समस्या उद्भवतात. तुम्हाला तुमच्या आहाराकडे आणि पौष्टिकतेकडे लक्ष द्यावे लागेल. आरोग्य तज्ज्ञाच्या मते, ओमेगा-3 फॅटी ऍसिडमध्ये समृद्ध, अक्रोड केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात आणि टाळूची आर्द्रता राखतात. त्यात बायोटिन देखील असते जे केस आणि टाळू निरोगी ठेवते. तांब्याचे प्रमाण केसांचा रंग एकसमान करते आणि ते चमकदार ठेवते.
कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे त्याची केशभूषा आणि वेशभूषा यावरून ठरते असे म्हटले जाते. आजच्या ताणतणाव आणि धावपळीच्या जीवनशैलीत स्त्री असो की पुरुष यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे केस गळती होय. केस गळती टाळण्यासाठी त्यांना तेल लावावे तसेच आणखी काय करावे ? याचा प्रत्येक जण विचार करतो केसांची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेणे यासाठी आवश्यक आणि महत्त्वाचे ठरते.
केवळ महिलांनीच नव्हे तर पुरूषांनी सुंदर आणि घनदाट केसांसाठी तेल मसाज करणे अतिशय आवश्यक आहे. तेल मसाज न केल्यास केस कमकुवत होऊन तुटण्याची तसंच गळण्याची शक्यता असते. तेलामुळे कोरड्या केसांची, कोंडा तसंच केसांशी संबंधित अन्य समस्या कमी होण्यास मदत मिळते. तेलामुळे आपल्या केसांना पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. यामुळे आठवड्यातून दोन वेळा केसांना तेल मसाज करावा.
पूर्वी घरातील ज्येष्ठ मंडळी केसांना नियमित तेल लावण्याचा सल्ला देत असतात. पण रोजची धावपळ, ऑफिस किंवा अन्य महत्त्वाच्या कामांमुळे तेल लावणे शक्य होत नाही. याच प्रमाणे केसांनाही तेल लावण्याचे महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात केसांना तेल लावल्यास भरपूर लाभ मिळतात.
केसांच्या वाढीसाठी, केस जास्त गळू नयेत म्हणून आणि केसांच्या मुळांना चांगले पोषण मिळावे यासाठी आपण त्यांना तेलाने मसाज करतो. बाजारात विविध प्रकारची तेलं येतात. मात्र योग्य तेलामुळे केसांना फायदा होईल, व केसांची ही समस्या दूर होईल, असे सांगण्यात येत आहे. आठवड्यातून दोन वेळा केसांना हे तेल लावू शकता. पण केस धुतल्यानंतर केसांना तेल लावणे शक्यतो टाळावे. कारण यामुळे केसांमध्ये धूळ आणि माती जमा होण्याची शक्यता असते. धूळ, माती आणि प्रदूषणामुळे केसांचे प्रचंड नुकसान होते. यामुळे आपल्या केसांसह टाळूच्या त्वचेलाही नुकसान पोहोचते.
केसांना नियमित तेल लावल्यास कोंडा आणि टाळूला येणारी खाज कमी होण्यास मदत मिळेल. तेलामध्ये कडुलिंबाची पाने गरम करून घ्या आणि आंघोळ करण्यापूर्वी या तेलानं टाळू आणि केसांचा मसाज करावा. नियमित तेल मसाज केल्यास केस गळतीचाही त्रास दूर होईल. महत्वाचे म्हणजे डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी केसांना आयुर्वेदिक तेल लावा. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक लाभदायक ठरेल. आयुर्वेदानुसार डोकेदुखीची समस्या वाताच्या त्रासाशी संबंधित असतो. हा त्रास कमी करण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस केसांना तेल लावा.
Health Tips Hibiscus Tea Benefits Home Remedies