इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या मानवी शरीरातील सर्वच अवयव अत्यंत महत्त्वाचे आहेत, परंतु त्यातही हृदय या अवयवाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, कारण हृदय बंद पडले तर आपला मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे हृदयाला जपणे आवश्यक ठरते. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय खावे आणि प्यावे याचा प्रत्येकाने आजच्या काळात विचार करणे अत्यंत आवश्यक आणि गरजेचा आहे.
हृदय हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे ते निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. खराब जीवनशैली आणि अस्वस्थ आहारामुळे अनेक वेळा हृदयाशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत, आपण नियमित व्यायाम करणे आणि निरोगी आहार घेणे महत्त्वाचे आहे.अयोग्य जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव आणि आरोग्याला अयोग्य अन्न घेतल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
आपले हृदयाचे आरोग्य संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी जोडलेले आहे. अशा स्थितीत खाण्यापिण्यापासून व्यायामापर्यंत काळजी घ्या. हृदयाच्या आरोग्याबद्दल एकदा नक्की विचार करा. पण बहुतेक लोकांना असं वाटतं की हृदय निरोगी ठेवणे खूप महाग आहे. यासाठी त्यांना चरबीमुक्त किंवा कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या महागड्या वस्तूंचा वापर करावा लागतो. निरोगी हृदयासाठी, आपण महागड्या वस्तू खाणं नेहमीच आवश्यक नसतं. हृदयासाठी स्वस्त आणि पौष्टीक पदार्थ कोणते ? खाद्य तेलांपासून ते भाज्या आणि अन्य कोणते पदार्थ निरोगी हृदयासाठी खावेत?हे जाणून घेणे आवश्यक आहे.
तेल हे हृदयरोगाचे सर्वात मोठे कारण आहे, असे म्हटले जात असले तरी चरबी देखील शरीरासाठी आवश्यक आहे परंतु निरोगी प्रमाणात. वास्तविक, आपल्या शरीरात काही चरबी विरघळणारी जीवनसत्त्वे असतात, जी शरीरात फक्त चरबीमुळे पचतात. चरबी न घेतल्याने ह्या जीवनसत्त्वांचे नुकसान होते. म्हणूनच, हृदय निरोगी ठेवण्यासाठी, आपण स्वयंपाकासाठी तेल बदलून वापरावे. उदाहरणार्थ, आपण राइस ब्रान ऑयल आणि मोहरीचे तेल वापरू शकता. ही सर्व तेल अदल बदल करून वापरायला हवीत.
आहारात अनेक प्रकारचे हेल्दी ड्रिंक देखील समाविष्ट करू शकता. जे पोषक तत्त्वांनी समृद्ध आहेत. सकस आहार आणि हेल्दी ड्रिंक्समुळे तुमचे हृदय निरोगी राहण्यास मदत होईल. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर किमान एक ग्लास आणि शक्य झाल्यास पोटभर पाणी प्यावे. ते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. सोबतच तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी समतोल राखण्यास मदत करते. त्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही हायड्रेटेड राहता तेव्हा तुमचे हृदयही निरोगी राहते.
खरे तर दूध हृदयासाठी हानिकारक नाही. पण हार्टचा त्रास असेल तर हे लक्षात ठेवावे लागेल की खूप क्रीमयुक्त आणि चरबीयुक्त दूध वापरू नये. आपण दुधात टोन्ड दूध आणि गायीचे दूध पिऊ शकता. लक्षात ठेवा की कोणतेही दूध प्या, फक्त ते गरम करा आणि त्याची मलई काढा. ह्यासाठी तुम्ही हे देखील करू शकता, दूध गरम करून फ्रीजमध्ये ठेवा, क्रीम गोठल्यानंतर ते काढून टाका आणि नंतर दुधात थोडे पाणी घालून प्या.
डाळी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय आरोग्यदायी असते. विशेषतः हार्ट पेशंट साठी त्यात फायबरचे प्रमाण चांगले असते जे पोटासाठी खूप फायदेशीर असते आणि फॅट्स पचवण्यासही मदत करते. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही सोललेल्या भरड डाळी जसे मूग डाळ, मसूर आणि राजमा इत्यादी खाऊ शकता.बाजरी आणि नाचणी हे धान्य पोट निरोगी ठेवतात आणि ब्लड प्रेशर संतुलित ठेवायला मदत करतात. तसेच, जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला बाजरी, नाचणी, गावठी तांदूळ किंवा इतर काही गावठी, पॉलिश न केलेले धान्य मिळाले तर ते खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे
भाज्यांमध्ये तुमच्या आजूबाजूला मिळणाऱ्या हंगामी भाज्या खाऊ शकता. मोहरीच्या पानांची हिरवी भाज्या, पालक, तुरई, चवळी इ. भाज्या खूपच फायदेशीर आहेत. हंगामात येणाऱ्या नैसर्गिक भाज्या खाल्ल्याने अनेक हृदयासाठी आरोग्य फायदे मिळतात. या भाज्या देखील स्वस्त आहेत.भाज्या विविध जीवनसत्त्वे आणि पोषक तत्त्वांनी समृद्ध असतात. भाज्यांच्या रसामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हे हृदयाशी संबंधित अनेक समस्यांपासून संरक्षण करण्याचे काम करते. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात भाज्यांच्या रसाचाही समावेश करू शकता.
पेरू, आवळा, सफरचंद आणि मनुकांसारखी काही स्वस्त ड्राय फ्रूट्स देखील खाऊ शकता. आपण जे काही खातो ते त्याच हंगामातले असावे. कारण त्यावेळी आपले शरीर सहज पचवू शकते आणि कोणताही त्रास होत नाही. अशा हंगामी गोष्टीत नैसर्गिक साखर असते आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. तर अधिक तंतुमय पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा.
हर्बल चहा आरोग्यासाठी खूप चांगला आहे. यामध्ये कॅमोमाइल आणि लैव्हेंडर सारख्या हर्बल टीचा समावेश आहे. हे झोपेची गुणवत्ता सुधारण्याचे काम करते. अभ्यासानुसार, पुरेशी झोप न मिळाल्याने हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यामध्ये उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि मधुमेह यासारख्या आरोग्य समस्यांचा समावेश आहे. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी दररोज एक कप हर्बल चहाचे सेवन करा. ते आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.
Health Tips Heart Healthy Drink Benefits Nutrition