मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
आजच्या ताण तणावाच्या काळात कधी ना कधी प्रत्येकालाच डोकेदुखीचा त्रास होतो. कधी कधी तो काही वेळात बरा होतो तर कधी त्याचा त्रास असह्य होतो. अति डोकेदुखीमुळे ऑफिसची कामे नीट करता येत नाहीत. डोकेदुखीचा त्रास करण्यासाठी सतत प्रयत्न केल्याने तणाव आणि अस्वस्थता देखील येऊ शकते. सहाजिकच डोकेदुखीवर काय उपाय योजना आहेत हे जाणून घेणे आवश्यक ठरते.
भरपूर पाणी प्या
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होते, डोकेदुखी आणि मायग्रेनसारख्या समस्यांचे सामान्य कारण शरीरात पाण्याची कमी हे आहे. अनेकदा डोकेदुखीचा त्रास होत असेल तर दिवसभरात किती पाणी पिता आहात याकडे लक्ष द्या. डोकेदुखी झाल्यास दोन-तीन ग्लास पाणी प्या, डोकेदुखीमागील कारण पाण्याची कमतरता असेल तर अर्ध्या ते तीन तासात ती बरी होईल.
थोडीशी झोप घ्या
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे. झोपेच्या कमतरतेमुळे किंवा झोपण्याच्या अयोग्य वेळापत्रकामुळे, आपण वारंवार आणि तीव्र डोकेदुखीची तक्रार होते. एका संशोधनानुसार, काही व्यक्ती 6 किंवा त्याहून अधिक तास झोपतात, त्यांना डोकेदुखीची सर्वात कमी तक्रार असते. पण काही वेळा जास्त झोपल्याने देखील डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे रात्री किमान 7 ते 9 तासांची झोप घ्यावी.
मद्यसेवन कमी करा
मद्य किंवा अल्कोहोलमुळे सहसा डोकेदुखी होत नाही, परंतु मायग्रेनच्या रुग्णांमध्ये डोकेदुखी होऊ शकते. मायग्रेनचे एक तृतीयांश रुग्ण मद्यपान केल्यानंतर डोकेदुखीची तक्रार करतात. याशिवाय अल्कोहोलमुळे चिंता आणि तीव्र डोकेदुखी देखील होते.
योगाचा समावेश
योग अनेक फायद्यांसाठी ओळखला जातो, जसे की लवचिकता वाढवणे, वेदना कमी करणे, तणाव कमी करण्यात मदत करणे आणि जीवनाची एकूण गुणवत्ता सुधारणे होय, पण योगामुळे तुमच्या डोकेदुखीची तीव्रता आणि वारंवारता कमी होऊ शकते.
आल्याचा चहा
अद्रक तथा आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. अनेक पारंपारिक औषधांमध्ये आल्याचा वापर केला जात आहे. भारतीय जेवणातही याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. एका संशोधनानुसार, आले मायग्रेनच्या डोकेदुखीची तीव्रता कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच ते मळमळ आणि उलट्या यांसारखी लक्षणे देखील कमी करते.